IMPIMP

Aditya Thackeray | टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरे आक्रमक, एकनाथ शिंदेंवर केला आरोप, म्हणाले – ‘एका माणसाच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र…’

by nagesh
Maharashtra Politics | aditya thackeray eknath shinde government suspension of aditya thackerays dream projects

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) गुजरातला गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरोधात (Shinde-Fadnavis Government) संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी राज्य सरकारला (State Government) चारही बाजूने घेरले आहे. सोशल मीडियावर सुद्धा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता शिवसेना नेते (Shivsena Leader) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटले की, मागील चार महिन्यांमध्ये राज्यात येणारे 4 मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. गुंतवणूकदारांना विद्यमान सरकारवर विश्वास राहिलेला नाही. ते मुंबईतील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे म्हणाले, टाटा एअरबस प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणावा, असे आम्ही सत्ताधार्‍यांना सांगत होतो. एकीकडे कृषी क्षेत्राचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे उद्योग क्षेत्रातही आपल्या हातातून चार प्रकल्प गेले आहेत. पहिला प्रकल्प हा वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta-Foxconn) आहे.

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधिमंडळात सांगितले होते, की हा प्रकल्प राज्यात येईल. या प्रकल्पाविषयी ऑगस्टपर्यंत बैठका झाल्या. मात्र सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला गेला. दुसरा प्रकल्प हा बल्क ड्रग पार्क (Bulk Drug Park) हा आहे. आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेज (Pharmacy College) आहेत. मात्र बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प चार अन्य राज्यांना देण्यात आला. सत्ताधारी मात्र हा प्रकल्प राज्यात आणू शकले नाहीत.

 

ते म्हणाले, मेडिकल डिव्हाईस पार्क (Medical Device Park) हा तिसरा प्रकल्पदेखील राज्यातून गेला. हा प्रकल्प औरंगाबादेत होणार होता. चौथा प्रकल्प हा टाटा एअरबस हा आहे. हा चौथा प्रकल्पही महाराष्ट्रातून गेला आहे.

 

जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) होते,
तेव्हा आमचा केंद्र सरकारशी (Central Government) चांगला संवाद सुरू होता.
मात्र सध्याचे घटनाबाह्य सरकार आल्यापासून सरकारचे एक इंजिन फेल झालेले आहे.
याच कारणामुळे हे प्रकल्प परराज्यात गेले आहेत. कदाचित तिकडच्या राज्यांतील निवडणुकांमुळे हे झाले असावे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोणताही उद्योजक तसेच गुंतवणूकदाराला या सरकारवर विश्वास राहिलेला नाही.
हे थोड्या दिवसांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काही आमदार नाराज असल्याचे माझ्या कानी आले आहे.
दोन-तीन आमदारांमध्ये जाहीर भांडण सुरू आहे. महाराष्ट्र सध्या ज्या परिस्थितीतून जात आहे, ते चांगले नाही.
एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे महाराष्ट्र मागील चार महिन्यांपासून फटके खात चालला आहे,
असा आरोप आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला.

 

 

Web Title :- Aditya Thackeray | aditya thackeray criticizes eknath shinde government over loosing tata airbus project

 

हे देखील वाचा :

Nitin Gadkari | गडकरींनी भरदिवसा मुंबईकरांना दाखवलं स्वप्न, ‘200 प्रवासी घेऊन डबल डेकर बस उडणार’

Police Bharti 2022 | नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती स्थगित, पुढील आठवड्यात निर्णय

CM Eknath Shinde | टाटा एअरबस प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

 

Related Posts