IMPIMP

Aditya Thackeray | आमचे हिंदुत्व थोडे वेगळे, त्यात बलात्कार करणार्‍याची…; आदित्य ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला सुनावले

by nagesh
Aditya Thackeray | 'All this is an attempt to gentrify and economically isolate Maharashtra' - Aditya Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील (Bilkis Bano Rape Case) दोषींना सोडण्यावरुन भाजपा (BJP) आणि गुजरात सरकारवर (Government of Gujarat) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात बिल्किस बानोच्या गुन्हेगारांना सोडल्याचा उल्लेख केल्यानंतर, शिवसेना धर्मनिरपेक्ष होत असल्याचा आरोप भाजपाने केला होता. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, मी आजोबांकडून जे हिंदुत्व शिकलो, त्यात बलात्कार करणार्‍याची आरती-पूजा केली जात नाही. जो बलात्कारी असेल, त्याला फाशीच द्यायला हवी, हे माझ्या आजोबांचे हिंदुत्व (Hindutva) होते. मग तो कोणत्याही धर्माचा असो. बलात्कार्‍याचा धर्म, प्रांत, जात, भाषा न पाहता फाशी द्यावी. आदित्य एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, धर्माविरोधात कोणी येत असेल, तर आम्ही त्याविरोधात उभे राहू.
पण, आमचा धर्म सर्वांची सेवा करणे, सर्वांना सोबत घेऊन चालणे, हेच शिकवतो.
हिंदुत्वाचा विचार केला तर, उद्धव ठाकरे यांनी जितके वेळेस अयोध्येला भेट दिली,
तितकी क्वचितच संपूर्ण देशातील कोणीही भेट दिली असेल. आमचे हिंदुत्व थोडे वेगळे आहे.
आम्ही औरंगाबादचे नाव बदलले, उस्मानाबादचे नाव बदलले तेव्हा हिंसाचार झाला नाही.
आमचे हिंदुत्व द्वेष पसरवत नाही.

 

आगामी निवडणुका कशा लढणार, याबाबत उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दारांना पुन्हा जागा दिली जाणार नाही.
त्यांच्या जागेवर, ते निवडून येतील का, हा प्रश्न त्यांना विचारायला हवा.
अनेकांनी आता निवृत्तीची योजना तयार केली आहे. कोणासोबत निवडणूक लढवायची, हा निर्णय वरिष्ठ घेतील.

 

 

Web Title :- Aditya Thackeray | shivsena leader aditya thackeray talks on shivsena hindutva eknath shinde group and slams bjp over bilkis bano case

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांचा घातला गंडा

CM Eknath Shinde | ढाल-तलवार चिन्ह मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरेंची मशाल ही पंजाच्या हातात आहे, त्यामुळे तिचा कोणी स्वीकार करणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला

MLA Sanjay Gaaikwad | ‘उद्धव ठाकरे बापाच्या नावाची शिवसेना वाचवू शकले नाहीत, आम्ही त्यांच्या नावाने शिवसेना स्वीकारली’, संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर टीका

 

Related Posts