IMPIMP

Aditya Thackeray | मास्कमुक्त महाराष्ट्र नाहीच; आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar slams shiv sena aditya thackeray over protest against metro car shed in aarey

नाशिक:  सरकारसत्ता ऑनलाइनकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Corona Third Wave) प्रभाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. तर
दुसरीकडे राज्यात लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. दरम्यान, जगातील काही देशांनी मास्क मुक्त
देश (Mask Free Country) म्हणून जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet Meeting) राज्य मास्कमुक्त करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे सर्वत्र महाराष्ट्र मास्कमुक्त (Maharashtra Mask Free) होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या चर्चेसंदर्भात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत त्यांनी (Aditya Thackeray) मास्कमुक्त महाराष्ट्र तूर्त तरी शक्य नसल्याचे म्हंटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) म्हणाले की, मास्कसक्ती काढली जाईल हा गैरसमज पहिल्यांदा दूर केला पाहिजे. कोरोना संकटात (Corona Crisis) जे काही निर्णय घेतले आहेत ते सर्व निर्णय डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) सुद्धा कोरोनाचे संकट संपल्याचे जाहीर केलं नाही. ओमायक्रॉन (Omicron) किंवा कुठलाही व्हेरिएंट हा वीक किंवा स्ट्राँग आहे, व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. त्यामुळे आपला जीव वाचवायचा असेल तर मास्क महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता राज्यातील मास्कसक्ती तूर्त तरी हटणार नाही हे निश्चित झाले आहे.

 

 

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) मंत्रिमंडळाची २७ जुनेवारीला बैठक पार पडली. त्यामध्ये मास्क (Mask) संदर्भात चर्चा झाली. जगातील युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आपण अशी भूमिका घेणार का ? अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. मास्क वापरण्यासंदर्भात टास्क फोर्सबाबत (Task Force) चर्चा केल्यानंतरच मास्क बाबतीत धोरण होणार असल्याचे समजते. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी चौथी लाट (Corona Fourth Wave) येण्याची शक्यता आहे. त्याचा अभ्यास करूनच राज्य सरकार (State Government) निर्णय घेणार असल्याचं बोललं जात होतं.

 

 

Web Title :  Aditya Thackeray | will maharashtra mask free state soon on this question minister aaditya thackeray gives answer

 

हे देखील वाचा :

Pune Weather | पुण्यात थंडीचा कडाका वाढला ! हंगामातील सर्वात निचांकी किमान तापमानाची नोंद

Maharashtra Police Recruitment | ‘राज्यात 7 हजार 200 पोलिसांची भरती करणार’ – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Pune Crime | पुण्यातील 15 वर्षाच्या मुलीला पळवून नेऊन मंदिरात लग्न; गर्भवती राहिल्यावर सोडले घरी

Pune Crime | पुण्यात 47 वर्षीय नराधम बापाकडूनच 17 व 14 वर्षाच्या मुलींसमोर अश्लील व घाणेरडं कृत्य; पेट्रोल टाकून मारण्याची धमकी

 

Related Posts