IMPIMP

Ajit Pawar | अजितदादांनी भरसभेतच सुनावले पोलिस अधिकार्‍याला खडे ‘बोल’, म्हणाले – ‘चांगले DySP म्हणून तुम्हाला बारामतीत आणलं होतं…’

by nagesh
Ajit Pawar | bjp mp sujay vikhe patil allegation on ajit pawar controversial statement about chhatrapati sambhajiraje

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे परखड आणि स्पष्टवक्तेपणा मुळे ओळखले जातात. त्यांना कामांमध्ये हलगर्जीपणा केलेला अजिबात आवडत नाही. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना ते खडे बोल सुनावत असतात. कामाच्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाहीत. मग तो पक्षाचा पदाधिकारी असो किंवा एखादा अधिकारी (Officer). याचाच प्रत्यय रविवारी पुणे ग्रामीण पोलिसांना (Pune Rural Police) आला. बारामती (Baramati) तालुक्यात झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी (Ajit Pawar) जाहीर सभेत DySp दर्जाच्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बारामती तालुक्यात एका गावात सुरु असणाऱ्या अवैध दारु विक्रीमुळे (Liquor sale) त्रस्त झालेल्या महिलेने अजित पवार (Ajit Pawar) यांना निवेदन देऊन आपली व्यथा सांगितली.
माझा नवरा दारु पिऊन येतो, घरात लक्ष देत नाही, घराला घरपण राहिले नाही.
त्यामुळे अवैध दारु विक्री बंद (selling illegal liquor) करावी.
अशी मागणी करणारे निवेदन महिलेने अजित पवार यांना दिले.

अजित पवारांनी महिलेचे निवेदन स्विकारुन संबंधित अधिकाऱ्याला भरसभेत धारेवर धरले.
ते म्हणाले, DySp इथे दारुबंदी व्हावी म्हणून मला निवेदन आले आहे.
2007 मध्ये दारुबंदी झाली होती. मात्र आता ती पुन्हा सुरु झाली आहे.
याचा त्रास येथील गोरगरीब महिलांना होत आहे.
नेमकी अडचण काय आहे? कायमची दारु बंदी करुन टाका.
जे कोणी असतील त्यांना टाडा (TADA Act) लावा, काय लावायचे ते लावा पण कायमची दारुबंदी करुन टाका.
मी तुम्हाला चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले होते.
बारामतीच्या कुठल्याही भागात चालणारे दोन नंबरचे धंदे, बेकायदेशीर दारुविक्री, हातभट्टी कायमची बंद कारा.
जी कारवाई करायची असेल ती करा. असे सांगत अवैध धंद्यावर कारवाई (Action) करण्याची सूचना अजित पवार यांनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web  Title : Ajit Pawar | ajit pawar angry on police officer dysp baramati daru bandi pune rural police

 

हे देखील वाचा :

Babasaheb Purandare | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ST Workers Strike | एसटी कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचे महत्वाचे विधान, म्हणाले…

Ajit Pawar | राज्यात इंधनाचे दर कमी होणार का? अजित पवार म्हणाले…

Mumbai NCB | जळगाव जिल्ह्यात 1500 किलोचा गांजा जप्त; मुंबई NCB पथकांची कारवाई

 

Related Posts