IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल, केले ‘हे’ 4 गौप्यस्फोट

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar critisied ncp chief sharad pawar know details Maharashtra NCP Crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – अजित पवारांच्या (Ajit Pawar) शपथविधीनंतर आज एमएनटी येथील बैठकीत बोलताना शरद पवारांवर (NCP Chief Sharad Pawar) थेट टिकास्त्र डागत अनेक गौप्यस्फोट केले. 2014 साली वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) शपथविधीला आम्हाला जायला सांगितलं, जर त्यांच्या सोबत जायचं नव्हतं, तर आम्हाला का तिथे पाठवलं? असा सवालही अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार यांना केला. यावेळी शरद पवारांनी एका आमदाराला धमकी दिल्याचाही गौप्यस्फोट केला आहे.

2017 मध्येही युतीसाठी भाजप सोबत बैठक

2017 मध्ये वर्षा बंगल्यावर बैठक झाली होती. राष्ट्रवादीकडून अजित पवार (Ajit Pawar), जयंत पाटील (Jayant Patil), सुनिल तटकरे (Sunil Tatkare) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. भाजपकडून (BJP) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उपस्थित होते. तेव्हा भाजप म्हणालं आम्ही 25 वर्ष शिवसेनेसोबत (Shivsena) होतो आणि आम्ही त्यांची साथ सोडणार नाही. त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात पाच बैठका झाल्या. मात्र आम्हाला सांगण्यात आलं की, बाहेर काहीच बोलायचं नाही, असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला.

माझ्याकडे 53 आमदारांच्या सह्यांचे पत्र

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळातही भाजपसोबत सत्तेत सहभागी व्हावं,
असं पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांनी दिलं होतं,
असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) केला होता.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी उपमुख्यमंत्री असताना, माझ्याच केबिनमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी एक पत्र ड्राफ्ट केलं. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) साहेबांनी 53 विधानसभेचे आमदार आणि इतर परिषदेच्या आमदारांनी त्यावर सह्या केल्या होत्या. तेव्हा आपापली कामं व्हायची असतील तर सत्तेत सहभागी व्हावं, अशी विनंती सर्व आमदारांनी केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

82 वय झांल, कधी थांबणार?

अजित पवार पुढे म्हणाले, आजही ते माझं दैवत आहे आजही ते श्रद्धास्थान आहे.
एखादा माणूस नोकरीला लागला की 58 व्या वर्षी रिटायर (Retired) होतो.
आयपीएस अधिकारी 60 व्या वर्षी रिटायर होतो.
राजकीय जीवनात असेल तर भाजपमध्ये (BJP) 75 व्या वर्षी रिटायर केलं जातं.
चुकलं तर सांगा अजित तुझं चुकलं, चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ.
आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो ही चूक आहे आमची? असे अजित पवार म्हणाले.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar critisied ncp chief sharad pawar know details Maharashtra NCP Crisis

Related Posts