IMPIMP

Ajit Pawar | शिंदे-फडणवीस 3 तासांनंतरही कार्यक्रमाला न आल्याने अजितदादा निघून गेले; आयोजकांना झापले, म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar expressed his displeasure over the stalled work of mumbai goa highway

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   Ajit Pawar | मंत्रालयात आयोजित फिफाच्या कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तीन तास उशीर होऊनही न आल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)
कार्यक्रमातून निघून गेले. जाताना अजित पवार यांनी आयोजकांनाही झापले. कार्यक्रम नियोजित वेळी सुरु होणे गरजेचे असते. पण आज जे झाले ते
बरोबर नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फिफाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना आमंत्रित करण्यात आले होते.

 

पण सकाळी शिंदे-फडणवीस सरकारची कॅबिनेट बैठक असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नियोजित वेळी कार्यक्रमाला येता आले नाही.
अजित पवार मात्र कार्यक्रमाच्या नियोजित वेळी मंत्रालयात हजर झाले. त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची तीन तास वाट पाहिली.

 

कार्यक्रमाची नियोजित वेळ उलटूनही तब्बल तीन तासानंतर कार्यक्रम सुरु न झाल्याने अजित पवार मंत्रालयातून निघून गेले.
जाताना त्यांनी कडक शब्दात आयोजकांना झापले आणि नाराजी व्यक्त करून ते मंत्रालयातून बाहेर पडले.

 

विशेष म्हणजे तीन तास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची वाट पाहणार्‍या अजित पवारांचीच मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खिल्ली उडवली आहे.
अल्बर्ट पिंटो को इतना गुस्सा क्यूँ आता है..? असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar left the mantralaya as the fifa logo unveiling program over did not start after waiting for three hours

 

हे देखील वाचा :

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Abdul Sattar On Shivsena Dasara Melava | मंत्री अब्दूल सत्तार यांचा शिवसेनेला इशारा, म्हणाले – ‘घुसून सभा घेतली तर…’, दसरा मेळाव्याच्या जागेचा वाद चिघळणार!

 

Related Posts