IMPIMP

Ajit Pawar | ‘निसर्ग सौंदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा’ – बारसू रिफायनरी प्रकरणावर अजित पवारांचे मत

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on protest against barsu refinery project

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरुन (Barsu Refinery Project) मोठा वाद सुरु झाला आहे. या प्रकल्पाना स्थानिकांनी विरोध करत आंदोलन सुरु केले आहे. तर पोलिसांकडून आंदोलकांवर बळाचा वापर झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणावर विविध राजकीय नेत्यांनी आपली मते मांडली आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. कोकणाच्या निसर्ग सौदर्यावर परिणाम न होता हा प्रकल्प पुढे न्यावा, अशी भूमिका अजित पवार (Ajit Pawar) यांनी मांडली आहे.

 

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विकासाच्या आड कधीच येणार नाही. विकास साधताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. लोकांच्या मनातील समज, गैरसमज असतील ते निकाली निघाले पाहिजे. स्थानिकांचे प्रश्न संवादाने सोडवायला हवे. सर्वेक्षण थांबवावे (Ratnagiri Refinery Survey) असं आव्हान आम्ही केले आहे. स्थानिकांशी चर्चा करा, असे अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

समृद्धी महामार्गालाही (Samriddhi Highway) लोकांचा विरोध होता. पण चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर कुठे परिणाम होणार नसेल तर प्रकल्प पुढे न्यावा. लोकांना विश्वासात घेऊन करावे. संवेदनशील पद्धतीने मार्ग काढावा असं आवाहन अजित पवार यांनी राज्य सरकारला केलं. मी राजन साळवी (Rajan Salvi) यांचे विधान वाचले. त्यांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे.
बेरोजगार, महागाई मोठ्या प्रमाणात आहे. या प्रकल्पातून रोजगार मिळणे चांगली बाब आहे. मात्र पर्यावरणाचा विचार केला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar on protest against barsu refinery project

 

हे देखील वाचा :

Pune PMPML Bus News | कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या 2 नवीन मार्गावर पीएमपीची बससेवा, जाणून घ्या मार्ग

Uddhav Thackeray | ‘जमिनी आमच्या-इमले तुमचे, चालणार नाही’, बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : घरफोडी चोरीचे 80 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास नर्‍हे परिसरातून अटक; 5 गुन्हयांतील 11 लाखाचा माल जप्त

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

 

Related Posts