IMPIMP

Uddhav Thackeray | ‘जमिनी आमच्या-इमले तुमचे, चालणार नाही’, बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

by nagesh
 Uddhav Thackeray | uddhav thackeray comment on ratnagiri rajapur barsu refinery project

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  मागील काही दिवसांपासून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरुन (Barsu Refinery Project) राज्यातील राजकारण (Maharashtra Political News) चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध असून सरकारकडून पोलीस बळाचा वापर केला जात आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) हल्लाबोल केला आहे. हा प्रकल्प चांगला आहे तर मग लोकांची डोकी फोडून का सांगत आहात? जमिनी आमच्या- जुमले तुमचे, हे चालणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी पत्र दिलं होतं पण…

उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी केलेल्या आरोपांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. जरी मी पत्र दिलं होतं, पण मी अडीच वर्षात पोलीस बळाचा वापर करुन तिथे गेलो नाही. राज्याच्या मुळावर येणारे विषय मी थांबवून ठेवले होते. नाणार, बारसूची भूमिका माझी नाही, तर तिथल्या लोकांची भूमिका होती. मुख्यमंत्री झाल्यावर प्राथमिक अहवाल घेतला. बारसूची जागा मोकळी आहे म्हणून सांगितल्याचं ठाकरेंनी सांगितलं. तसेच बारसूचा प्रकल्प पर्यावरणाला हानी करणारा आहे, तो प्रकल्प आम्हाला नको, असंही ठामपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

 

जमीन आमची-इमले तुमचे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना बारसूबाबत पत्र दिलं होतं पण स्थानिकांशी गद्दारी केली नाही. मी तुमच्यासारखी स्थानिकांवर जबरदस्ती केली नाही. पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प आम्हाला नको. जर स्थानिकांच्या भल्याचा प्रकल्प असेल तर लोकांवर जबरदस्ती का करण्यात येत आहे? असा सवाल करु जमीन आमची, इमले तुमचे हे कसं चालेल? असा सवाल त्यांनी केला. तसेच मूळ मालकांकडून जमिनी दलालांच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे दलालांचा होकार हा नागरिकांचा होकार समजू नका. प्रकल्पाबाबतचं सत्य लोकांना समजलंच पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

 

 

 

कुणाची सुपारी तुम्ही घेताय?

कुणाची सुपारी तुम्ही घेत आहात? जमीन आमची आणि इमले तुमचे हे धोरण चालणार नाही. लोकांचा आवाज सरकारला एकावाच लागेल. बारसूत प्रकल्प नको ही स्थानकांची भूमिका आहे, तीच आपल्या शिवसेनेची (Shivsena) भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शेपट्या घालून आत बसणारे…

केवळ 60 टक्के कामगार संघटित आहेत, बाकीचे सर्व असंघटित आहेत. अडीच वषात आपण 25 मोठे उद्योग आणि अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणत होतो, काही आणली. त्यातील बरेचसे यांनी डोळ्यादेखत पळवून नेले, ओरबडून नेले, तरी शेपट्या घालून आत बसणारे बाळासाहेबांचे विचार दाखवत आहेत? हे बाळासाहेबांचे विचार? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला.

 

 

फक्त जोडे पुसण्याची लायकी

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, येताना माहिती मिळाली ती खरी का खोटी पहा, सध्याचे निरुद्योगी मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तैवानच्या कंपनीसोबत एमओयु केला होता. दोन हजार तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार म्हणून फोटो काढले, ती जोडे बनवणारी कंपनी देखील तामिळनाडूत गेली, हे बसलेत जोड पुसत, फक्त जोडे पुसण्याची लायकी असलेली लोक राज्य करत आहेत, महाराष्ट्राचं काय होणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray comment on ratnagiri rajapur barsu refinery project

 

हे देखील वाचा :

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : घरफोडी चोरीचे 80 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास नर्‍हे परिसरातून अटक; 5 गुन्हयांतील 11 लाखाचा माल जप्त

Supreme Court On ESZ | राष्ट्रीय उद्याने, वन्यजीव अभयारण्ये व संरक्षित जंगलांच्या सीमेभोवतीच्या 1 किमीच्या पट्टयातील बांधकामबंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Abdul Sattar | महाराष्ट्राच्या ‘भावी मुख्यमंत्र्या’च्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी सुचवलं ‘या’ भाजप नेत्याचं नाव

Maharashtra Political News | महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप! ठाकरे गटाचे 13, राष्ट्रवादीचे 20 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट

 

Related Posts