IMPIMP

Ajit Pawar | त्याबद्दल मला प्रशिक्षण मिळेल का आणि ते मोफत की फी लागणार? अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar taunt devendra fadnavis maharashtra political Marathi news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकतेच राज्यातील अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य
केले आहे. सध्याच्या सरकारमधील पालकमंत्र्यांबाबत (Guardian Minister) बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांना पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण (Training) कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे? असं
त्यांना विचारतो आणि ज्ञानात भर पाडून घेतो, असा टोला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका करताना एक जिल्हा सांभाळण सोपं नाही, फडणवीस सहा जिल्हे कसे सांभाळणार आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले होते. याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना प्रशिक्षण देऊ, असा टोला लगावला होता. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

 

दरम्यान, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवीच्या फोटोबद्दल केलेल्या विधानामुळे भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. मात्र यातून आता राष्ट्रवादीने (NCP) हात झटकल्याचे पहायला मिळत आहे. देवी सरस्वतीच्या फोटोवरुन भुजबळांनी जे वक्तव्य केलं ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असे अजित पवार यांनी दिली.

 

बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एका कार्यकर्त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ही मारहाण योग्य वाटत नाही. मतदारांना चांगली लोकं निवडून यावी,
असं वाटतं. लोकांना मुस्काटात मारणारी आणि बंदूक काढणारी लोकं नको असतात, असे पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar taunt devendra fadnavis maharashtra political Marathi news

 

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | NCP च्या महिला नेत्याचा BJP मध्ये प्रवेश, बारामतीमध्येच शरद पवारांना मोठा धक्का!

Pune PMC News | आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे हिलटॉप हिलस्लोपवरील इमारतीत बेकायदा पुर्नवसन; महापालिकेने इमारतीच्या मालकाला बजावली नोटीस : रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

Kolhapur ACB Trap | शौचालय बिल मंजूर करण्यासाठी 10 टक्के कमिशन, 30 हजारांची लाच घेताना ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts