IMPIMP

Ajit Pawar | बाळासाहेब मुस्लिम विरोधक होते हे म्हणणं योग्य नाही, पण…- अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | balasaheb thackeray birth anniversary ncp ajit pawar on balasaheb painting in vidhan bhavan

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray Birth Anniversary) विधिमंडळामध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण (Oil Painting Inauguration) करण्यात आलं. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनोगत व्यक्त करताना, बाळासाहेबांना आज हिंदुहृदयसम्राट असं ओळखळं जातं, पण त्यांची खरी ओळख ही शिवसेनाप्रमुख अशी आहे, असं मला वाटतं, त्यामुळे त्यांच्या तैलचित्रावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असं लिहिण्यात यावं अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्याकडे केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane), राज ठाकरे (Raj Thackeray), विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.

 

बाळासाहेब मुस्लिम विरोधक नव्हते
अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी सगळ्यांना बरोबर नेण्याची भूमिका घेतली. त्यांनी कधीही मुस्लिमांना विरोध केला नाही. शिवसेनेचा मुंबईतील पहिला महापौर झाला. त्यावेळी बाळासाहेबांनी मुस्लिम नगरसेवकांची मदत घेतली होती. बाळासाहेब मुस्लिम विरोधक होते असं म्हणणं योग्य नाही, पण भारताविरोधी आणि पाकिस्तानधार्जिण्या लोकांच्या विरोधात मात्र ते नक्की होते.

 

बाळासाहेबांमध्ये दुटप्पीपणा नव्हता
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक वेगळा कार्यक्रम होत आहे. बाळासाहेब हे 55 वर्ष महाराष्ट्राचा अभिमान राहिले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि देशाच्या स्वाभिमानासाठी त्यांचे तैलचित्र लावणं हे अभिमानाची गोष्ट आहे. जनमानसावर जरब असलेलं दुसरं व्यक्तिमत्व नाही. त्यांच्या जगण्यात दुटप्पीपणा नव्हाता, जे आत ते ओठात होतं, असंही अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावेळी राजकारणात कपटबुद्धी नव्हती
भाजपसोबत (BJP) युती असताना, आणीबाणीच्या काळात बाळासाहेबांनी इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनाही पाठिंबा दिला होता.
सर्व राष्ट्रीय नेते मातोश्रीवर जायचे, त्यावेळी राजकारणात कपटबुद्धी नव्हती.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) बांधताना बाळासाहेब ठाकरे
यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मोकळीक दिली होती, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- Ajit Pawar | balasaheb thackeray birth anniversary ncp ajit pawar on balasaheb painting in vidhan bhavan

 

हे देखील वाचा :

Nargis Fakhri | अभिनेत्री नर्गिस फाखरीचा स्विझरलँडमधील खास फोटोज व्हायरल

Supriya Sule | नाव न घेता सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला; म्हणाल्या…

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

 

Related Posts