IMPIMP

Ajit Pawar | मुख्यमंत्री बघा कसे सडपातळ ! ‘पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा, आर्मीतल्या जवानांसारखा फिटनेस ठेवा’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar on coronavirus cases in maharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना त्यांच्या फिटनेसवर (Fitness) लक्ष द्यायला सांगितलं आहे. पोलिसांच्या 112 हेल्पलाईन (112 Helpline) आणि सीसीपीडब्ल्यूसी (CCPWC) प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमावेळी अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. (Ajit Pawar On Maharashtra Police Fitness)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (R. R. Patil) गृह खातं पाहत होते त्यावेळी त्यांचं पोलिसांच्या आरोग्याकडे लक्ष होतं. आता काही पोलिसांची पोटं सुटली आहेत. ते गुन्हेगारांचा पाठलाग कसा करत असतील असा प्रश्न समोर येतो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. त्यासोबतच मुख्यमंत्री बघा कसे सडपातळ आहेत, पोलिसांची सुटलेली पोटं कमी करायची आहेत. मी लहानपणापासून पोलिसांना बघत आलोय. पोलीस (Maharashtra Police) पहिलवान नको, पण पोलिसच वाटला पाहिजे. पोलिसांनो, सुटलेली पोटं कमी करा. आर्मीतील (Indian Army) जवानांसारखा फिटनेस ठेवा, असं आवाहन अजित पवारांनी पोलिसांना केलं आहे.

 

महाराष्ट्रातील जनतेने पोलिसांना विश्वास दिला आहे. कोरोना काळातही (Covid) पोलिसांनी सक्षमपणे काम केलं आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मात्र तुमच्या विश्वासाला डाग लागता कामा नये, असं अजित पवार म्हणाले. डायल 112 साठी वाहनं कमी पडतात यासाठी जिल्हा नियोजनमधील निधी दिला जाईल, असंही पवारांनी सांगितलं.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे डायल 112 प्रकल्प ?
दरम्यान, 100 नंबरला फोन केला तर आपण कुठुन फोन केला हे माहिती पडत नव्हतं. मात्र 112 ला फोन केल्यावर फोन कुठुन आला हे लगेच समजणार आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse-Patil) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | deputy chief minister ajit pawar advice to maharashtra police over fitness

 

हे देखील वाचा :

Diabetes Symptoms | टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीजमध्ये काय आहे अंतर? जाणून घ्या त्याची लक्षणे कशी ओळखावीत

Reasons Of Sweating At Night | रात्री जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? जाणून घ्या काय असतात कारणं

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

 

Related Posts