IMPIMP

Ajit Pawar | 16 आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही, अजित पवारांनी सांगितलं सत्तेचं गणित

by nagesh
Ajit Pawar | even if the mlas are disqualified shinde fadnavis government is stable ajit pawars big statement

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार (Ajit Pawar) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) नाराज
असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. मात्र आता अजित पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. जरी 16 आमदार
अपात्र (MLA Disqualified) झाले तरी सरकार (State Government) स्थिर राहील असं अप्रत्यक्ष दावा त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर 16
आमदार अपात्र झाले तर सत्ताधारी पक्षाकडे कसं बहुमत राहिल याचं गणितच अजित पवारांनी (Ajit Pawar) सांगितलं.

 

 

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, अपक्ष धरुन भाजपकडे (BJP) 115 आमदार आहेत. 106 त्यांचे आणि 9 अपक्ष. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले 40 आमदार, 10 अपक्ष आमदार थोड्यावेळ बाजूला ठेवले तरी दोघं मिळून 155 आणि 10 अपक्ष असे 165 आमदार सध्या सरकारकडे आहेत. त्यामुळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे 149 आहेत. त्यामुळे जरी 16 आमदार अपात्र झाले तरी देखील सरकारकडे बहुमताचा आकडा कायम राहिल असे अजित पवार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्या ज्ञानाप्रमाणे युतीकडील आमदारांची संख्या 149 राहते. विधानसभेतील (Legislative Assembly) आमदारांची संख्या 288 आहे. या 288 मधील 16 आमदार गेल्यावर विधानसभेची सदस्य संख्या 272 होते. 272 सदस्यसंख्या झाली तर बहुमताचा आकडा देखील कमी होईल. तो किती राहतो तो पहा. त्यामुळे तुम्हाला गणित समजेल. ही वस्तुस्थिती आहे. आपण वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. कारण नसताना चित्र रंगवण्यात काहीच गरज नाही. कुणाबद्दल शंका निर्माण करु नका, असंही अजित पवार म्हणाले.

 

 

मी भाषण करणार नाही
आज नागपूर येथे सभा होणार आहे. यानंतर नाशिक आणि कोल्हापूर येथे वज्रमूठ सभा पार पडणार आहे. माझ्यासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मी भाषण करणार की नाही असे प्रश्न उपस्थित होतायत. तर प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषण करायचं असं ठरलं आहे. कोणी दोघांनी भाषण करायचं ते पक्षान ठरवायचं आहे. मागच्या सभेत काँग्रेसकडून (Congress) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan), शिवसेनेकडून (Shiv Sena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि राष्ट्रवादीकडून (NCP) मी आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाषण केलं होतं.

 

 

Web Title :- Ajit Pawar | even if the mlas are disqualified shinde fadnavis government is stable ajit pawars big statement

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | ‘शरद पवार म्हणाले, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण…’, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; दाव्यावर भाजपची खोचक टीका

Pune Crime News | पुणे-विमाननगर क्राईम न्यूज : हॉटेल व्यावसायिकाकडे 25 हजाराच्या खंडणीची मागणी, एकाला अटक

Pune AAP On CBI Summon To Kejriwal | अरविंद केजरीवालांना सीबीआयने दिलेल्या नोटिस विरोधात, मोदी सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आपचा राज्यभर सत्याग्रह; पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काळी फीत बांधून निषेध

 

Related Posts