IMPIMP

Ajit Pawar | ‘याचा अर्थ अजित दादांची राष्ट्रवादीमध्ये…’, संजय शिरसाटांचे विधान

by nagesh
Ajit Pawar | shinde group mla sanjay shirsat on ajit pawar leader of opposition party post

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सुप्रिया सुळे आणि (NCP MP Supriya Sule) प्रफुल पटेल (Prafull Patel) यांना कार्यकारी अध्यक्षपदी नेमल्यानंतर आता अजित पवारांनी आपल्याला पक्षकार्याची संधी देण्याची विनंती केली आहे. शरद पवारांसमोरच (Sharad Pawar) त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या, अशी विनंती अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर हे विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळाच तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) नाराजीवर भाष्य केलं. विरोधी पक्षनेते पदाची मोठी जबाबदारी असताना, या पदावर काम करायचं नाही, असं अजित पवार म्हणतात, याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) त्यांची घुसमट होत आहे, असे शिरसाट म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संजय शिरसाट यांना विचारलं असता ते म्हणाले, अजित पवारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मला आता विरोधी पक्षनेतेपद नको, मला पक्षाचं काम द्या, अशी विनवणी अजित पवारांनी पक्षाकडे केली आहे. अजित पवारांची ही विनंती अत्यंत गांभीर्याने घेण्यासारखी आहे.

शिरसाट पुढे म्हणाले, एखाद्या एवढ्या मोठ्या नेत्याकडे विरोधी
पक्षनेत्यासारखं मोठ पद असूनही तो म्हणतो की, मला या पदावर काम करायचं नाही.
याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची जास्त घुसमट होतेय, असं त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय.
हे माझं मत नाही, राष्ट्रवादीमध्ये त्यांना योग्य न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे, असंही शिरसाट म्हणाले.

Web Title : Ajit Pawar | shinde group mla sanjay shirsat on ajit pawar leader of opposition party post

Related Posts