IMPIMP

Ajit Pawar | सत्ताधार्‍यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले – आम्ही कधी सत्तेत येऊन बसू कळणारही नाही

by nagesh
Ajit Pawar | balasaheb thackeray birth anniversary ncp ajit pawar on balasaheb painting in vidhan bhavan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | अधिकार्‍यांनो आणि कर्मचार्‍यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचं काम करू नका, दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही, असा सूचक इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या आडून राज्य सरकारला (State Government) दिला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार म्हणाले, आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्षे होतो. पवार साहेब (Sharad Pawar) केंद्रामध्ये कृषीमंत्री असताना आमच्याकडे केंद्रातील सत्ता होती. राज्यातील सत्ता होती. जिल्हा परिषद (Zilla Parishad) होती. एखाद दुसरी सोडली तर जवळपास सर्व पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात होत्या. इतर संस्थाही ताब्यात होत्या. मात्र आम्ही कधी सत्तेचा माज येऊ दिला नाही. सत्तेपायी आम्ही कधी विरोधकांनाही त्रास दिला नाही.

 

अधिकारी आणि कर्मचार्‍यांना इशारा देताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या सर्व अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना सांगायचे आहे की, अधिकार्‍यांनो आणि कर्मचार्‍यांनो कुणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीचे काम करू नका, दिवस बदलत असतात. कधी आम्ही सत्तेत येऊन बसू कळणारही नाही.

 

पवार पुढे म्हणाले, मला जर कळलं की, जाणीवपूर्वक आमच्या लोकांना त्रास दिला, तर ते मी सहन करणार नाही.
आमच्या लोकांचं काही चुकलं, अगदी मी चुकलो तरी कारवाई करा. कारण कायदा नियम सर्वांना सारखाच आहे.
मात्र काही चूक नसताना, काही दोष नसताना केवळ कुणीतरी सत्तेत असणारा माणूस सांगतो, म्हणून कुणालातरी त्रास देण्याचा प्रयत्न चाललेला आहे,
अशा लोकांना मी सांगू इच्छितो की, ही बाब शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही.
हे संविधानाने कुणाला शिकवलेलं नाही. नियम, कायदे सर्वांना सारखे असतात, याची दखल सर्वांनी घ्यावी.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | we will never know when we will come to power ajit pawars pointed warning

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘नाथाभाऊंचे जाणे दु:खद होते, पण आता…’, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगतिलं

Maharashtra Police | पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून ‘दसऱ्या’ची भेट, नैमित्तिक रजेत भरघोस वाढ; जीआर निघाला

Dasara Melava 2022 | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, पण…, नारायण राणे यांचे मोठं विधान

 

Related Posts