IMPIMP

Maharashtra Police | पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून ‘दसऱ्या’ची भेट, नैमित्तिक रजेत भरघोस वाढ; जीआर निघाला

by nagesh
Maharashtra Police | Dussehra gift from Shinde government to police officers-employees, substantial increase in casual leave; GR left

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली 21 सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह विभागाबाबत (Home Department) मोठे निर्णय घेतले होते. राज्यातील पोलिसांना (Maharashtra Police) दिलासा देताना राज्य सरकारने नैमित्तिक रजा वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) घेतला होता. पोलिसांना एका वर्षात 12 ऐवजी 20 राजा देण्याचा निर्णय घेण्यात घेण्यात आला होता. राज्य सरकारने याबाबत आज (सोमवार) जीआर जारी करत महारष्ट्रा पोलीस दलातील (Maharashtra Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दसऱ्याची मोठी भेट दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्यातील पोलीस शिपाई (Police Constable) ते पोलीस निरीक्षक (Police Inspector) यांच्या नैमित्तिक रजा (Casual Leave) 12 वरुन 20 करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आला होता. पोलिसांवरील (Maharashtra Police) कामाचा वाढता ताण, विविध सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने बंदोबस्त, व्हीआयपी ड्युट्या यामुळे या नैमित्तिक राजा आणखी वाढवून 20 दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आली होती. या संदर्भातील जीआर आज (सोमवार) गृहविभागाने जारी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलीस दलातील कामकाजाचा व्याप, प्रतिदिन साडे आठ तासापेक्षा अधिक वेळ थांबून कर्तव्य पार पाडण्याबाबत जबाबदारी,
विविध सण व उत्सवांच्या अनुषंगाने असलेले बंदोबस्त तसेच व्हीआयपी बंदोबस्त यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर व कार्य़क्षमेतवर परिणाम होतो.
पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्य़क्षमता, आरोग्य व कौटुंबिक स्वास्थ्य या दृष्टीकोनातून पोलीस शिपाई ते
पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.

 

Web Title :- Maharashtra Police | Dussehra gift from Shinde government to police officers-employees, substantial increase in casual leave; GR left

 

हे देखील वाचा :

Dasara Melava 2022 | उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाईल, पण…, नारायण राणे यांचे मोठं विधान

CM Eknath Shinde | प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार, आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा

NCP Chief Sharad Pawar | राज्यात दसरा मेळाव्यावरुन जे राजकारण सुरु आहे ते दुर्दैवी, शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

 

Related Posts