IMPIMP

झोपी गेलेला हिंदू समाज जागा होईल तेव्हा जग प्रकाशमान करेल – मोहन भागवत

by sikandershaikh
mohan bhagwat

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMohan Bhagwat | हिंदुत्त्वाबद्दल महात्मा गांधी म्हणायचे की हिंदुत्व म्हणजे सत्यासाठी सातत्यानं होणारं संशोधन. आजचा हिंदू समाज थकल्यामुळे झोपी गेला आहे. परंतु तो ज्यावेळी जागा होईल त्यावेळी तो आधीपेक्षा अधिक ऊर्जेने कामाला लागेल अन संपूर्ण जग प्रकाशमान करेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

दिल्लीत रविवारी एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी भागवत यांनी हिंदू समाजाबद्दल महत्त्वाचं विधान केलं. देशावर झालेल्या आक्रमणांचा संदर्भ देत देशाच्या समरसतेवर भागवत (Mohan Bhagwat) यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आक्रमक शक्तींनी संपत्ती मिळवण्याच्या हेतूनं भारतावर हल्ले केले. शक हूण कुषाण आले. पण ते आपल्यामध्ये सामावून गेले. आमच्यासारखे होणारे तेच राहतील. जे होणार नाहीत त्यांना राहण्याचा अधिकार नाही, अशी भूमिका घेऊन इस्लाम वेगवेगळ्या स्वरूपात आला. आपल्या संस्कृतींच्या प्रतिकांची मुस्लिम आक्रमकांनी मोडतोड केली. त्यांच्याविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालली. या काळात भारतीय संस्कृती आणि परंपरांचा प्रभाव आक्रमणकर्त्यांवर देखील पडू लागला. त्यातून समरसतेची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये दाराशिकोहसारखे लोक सहभागी झाले. त्यांनी वेदांचा अभ्यास केला. त्यांचा अनुवाद केला असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

औरंगजेबाने मुस्लिमांसोबत एकता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला विस्थापित करण्याचा प्रयत्न केला. देशात कोणीही परदेशी नाहीत, सर्वजण हिंदू पूर्वजांचेच वंशज आहेत. कोणीतरी आपलयाला बदलेल याची भीती नाही, भीती आहे ती एकाच गोष्ठीची ती म्हणजे या गोष्टी आपण विसरून जाऊ याची,’ असंही मोहन भागवत म्हणाले.

Related Posts