IMPIMP

Amol Palekar | प्रकृती खालवल्यानं अभिनेते अमोल पालेकर पुण्यातील रूग्णालयात दाखल

by nagesh
Amol Palekar | veteran actor amol palekar admitted pune hospital wife Sandhya Gokhale shares health update

सरकारसत्ता ऑनलाइन – Amol Palekar | बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अमोल पालेकर (Amol Palekar) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 77 वर्षीय अभिनेत्याला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital Pune) दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या आजारपणाची बातमी समजताच चाहत्यांनी त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले (Sandhya Gokhale) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अमोल पालेकर (Amol Palekar) यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी सांगितले की, ”अमोलची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. आधीपेक्षा त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या प्रकृतीची चिंता करण्यासारखी बाब नाही.”

 

अमोल पालेकर यांनी हिंदीसोबतच मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
अभिनयासोबतच तो दिग्दर्शनातील उत्कृष्ट कामासाठीही ओळखला जातो.
अमोलला 5 वेळा दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘आँखे’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अमोलने शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘पहेली’ चित्रपट बनवून आपल्या दिग्दर्शन प्रतिभेचे अभूतपूर्व सादरीकरण केले.

 

Web Title :- Amol Palekar | veteran actor amol palekar admitted pune hospital wife Sandhya Gokhale shares health update

 

हे देखील वाचा :

MLA Nitesh Rane | जामीन मिळाल्यानंतर आमदार नितेश राणेंची प्रकृती सुधारली; कोल्हापूरच्या CPR मधून डिस्चार्ज मिळणार

Tripura High Court | हायकोर्टचा निर्णय ! वडिलांच्या उत्पन्नावर अवलंबित विवाहित मुलगी सुद्धा मृतक कोट्यांतर्गत नोकरीसाठी पात्र, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

Gangster Sharad Mohol | गँगस्टर शरद मोहोळ टोळीचा म्हाळुंगेमधील राधा चौकात ‘राडा’ ! वाहनांवर दगडफेक करुन फोडल्या काचा, दहशत पसरविण्याचा प्रयत्न

 

Related Posts