IMPIMP

Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना तिकीट न देण्याचे उद्धव ठाकरेंचे षडयंत्र – आ. प्रसाद लाड

by nagesh
Andheri By Election | bjps serious allegations against shivsena uddhav thackeray group why the delay in nominating rituja latke in andheri by election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला आहे, तरी देखील अद्याप कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटाकडून (Thackeray Group) अंधेरी पूर्व मधील दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्या महानगरपालिकेत नोकरीस असल्याने अद्याप त्यांचा राजीनामा (Resign) मंजूर झाला नाही. त्यामुळे त्यांना अर्ज दाखल करण्यास विलंब होत आहे. आता शिवसेना दुसऱ्या उमेदवाराचा विचार करत असून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) ऋतुजा लटके यांना उमेदवारी देणार नसल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऋतुजा यांना उमेदवारी देण्याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून शिवसैनिकांची आणि जनतेची दिशाभूल केली जात आहे. ऋतुजा लटके यांना तिकीट देण्यात विलंब का होत आहे? यावरुन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये लटके यांना उमेदवारी देण्याबाबतचे मतभेद उघड होत आहेत, असा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केला आहे.
शिवसेना मागील 25 वर्षे महापालिकेत सत्तेत आहे.
त्यामुळे त्यांना तेथील नियम आणि कायदे चांगले माहीत आहेत.
तरी देखील त्यांनी मुद्दाम लटके यांना राजीनामा देण्यास उशीर केला.
लटके यांच्याकडून दोन राजीनामे देण्यात आले आहेत.
त्यामुळे या मागे कोणाचा हात आहे, कोणाचे षडयंत्र आहे, याचे उत्तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी
द्यावे, असे प्रसाद लाड म्हणाले.

 

तसेच राज्यात कोणतीही गोष्ट घडल्यानंतर भाजपवर आरोप करण्याचे शिवसेनेने बंद केले पाहिजे.
ऋतुजा लटके यांना तिकीट न देण्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कारस्थान आहे.
शिवसैनिकांना डावलायचे आणि जवळच्या लोकांवर अन्याय करायचा याचमुळे शिवसेनेत बंड झाले आहे, असा दावा देखील प्रसाद लाड यांनी केला.

 

 

Web Title –  Andheri By Election | bjps serious allegations against shivsena uddhav thackeray group why the delay in nominating rituja latke in andheri by election

 

हे देखील वाचा :

Jalgaon ACB Trap | माती वाहतूक करणाऱ्याकडू दीड लाख रुपये लाच घेताना सर्कल व तलाठी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

T20 World Cup 2022 | भारतासह ‘हे’ तीन संघ असणार सेमीफायलनमध्ये, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री वर्तवलं भविष्य

Andheri East by-Election | हायकोर्टाने फटकारले, कुहेतू ठेवून ऋतुजा लटकेंचा राजीनामा स्वीकारण्यास दिरंगाई; उद्या पत्र द्या, शिंदे गटाला मोठा धक्का

 

 

Related Posts