IMPIMP

Anil Bonde | नाना पटोले कोणत्या आधारावर ही मागणी करत आहेत – खासदार अनिल बोंडे

by nagesh
Anil Bonde | On what basis are Nana Patole making this demand - MP Anil Bonde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकार बरखास्तीची मागणी केली आहे. त्यावर भाजप राज्यसभा खासदार (BJP Rajya Sabha MP) अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वेळी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी केली होती, त्यामुळे कोणत्या आधारावर नाना पटोले म्हणत आहेत की, सरकार बरखास्त करा. नाना पटोलेंनी तोंडाच्या वाफा काढू नयेत, असे अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले.

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. यावेळी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) ताबडतोब या गोष्टींचे पंचनामे केले आणि एनडीआरएफच्या (NDRF) निकषांच्या दुप्पट मदत शेतकऱ्यांना दिली. अमरावती जिल्ह्याची मी माहिती घेतली. त्याप्रमाणे राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्तांना 1500 कोटी रुपये प्राप्त झाले होते. आणि दिवाळी सणाच्या पूर्वी त्यातील 1200 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप झाले होते.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) सत्तेत नसताना,
आम्ही शेतकऱ्यांना पन्नास हजार देऊ आणि एक लाख रुपये देऊ, अशा घोषणा करत होते.
पण सत्तेत आल्यानंतर त्यांनी केवळ 3 हजारांचा धनादेश शेतकऱ्यांच्या हातावर टेकवला होता.
शिंदे-फडणवीस (CM Eknath Shinde) सरकारने काहीही गाजावाजा न करता शेतकऱ्यांना भरघोस मदत केली आहे, असे बोंडे (Anil Bonde) यांनी यावेळी सांगितले.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे.
त्यामुळे विरोधी पक्ष राज्य शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहे.
तरी देखील राज्य शासन त्याची दाद घेत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
नाना पटोलेंनी (Nana Patole) शिंदे-फडणवीस सरकार शेतकरी विरोधी आहे तसेच ते घटनाबाह्य आहे,
असा आरोप केला होता. तसेच दिवाळी सणाच्या नंतर आपण राज्यपालांकडे हे सरकार बरखास्त करण्याची मागणी
करणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले होते.

 

Web Title :- Anil Bonde | On what basis are Nana Patole making this demand – MP Anil Bonde

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

Bacchu Kadu | रवी राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मी 50 खोके घेतल्याचे पुरावे नाही दिले, तर आम्ही… – बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

NCP MLA Nilesh Lanke | राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Shahajibapu Patil | 1999 चा किस्सा सांगत शहाजीबापू पाटील यांची शरद पवारांवर टीका, म्हणाले- ‘त्या’ गोष्टीचे शल्य आयुष्यभर बोचत राहील’

Related Posts