IMPIMP

Ankita Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून ! राज ठाकरेंना ‘शिवतीर्था’वर जाऊन दिले लग्नाचे आमंत्रण

by nagesh
Ankita Harshvardhan Patil | ankita harshvardhan patil will marry with nihar bindumadhav thackeray in mumbai Invited Raj Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन महाराष्ट्रातील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज (मंगळवार) मुंबईत मनसे प्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्था’वर ते आपली कन्या आणि चिरंजीवासह आले होते. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता (Ankita Harshvardhan Patil) ही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. याच लग्नसोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील राज ठाकरे यांच्या घरी आले होते. अंकिता पाटील यांनी फेसबुकवरुन राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. (Harshvardhan Patil)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील (Ankita Harshvardhan Patil) या ठाकरे घराण्याच्या (Thackeray family) सून होणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू आणि बिंदूमाधव (Bindumadhav) यांचे सुपूत्र निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांच्यासोबत अंकिता यांचा विवाह होणार आहे. हा विवाह सोहळा येत्या 28 डिसेंबरला मोजक्या लोकांच्या उपस्थित होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याच विवाह सोळ्याचे आमंत्रण (Invitation) देण्यासाठी ते आज राज ठाकरे यांच्या घरी आले होते.

 

अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सदस्या आहेत. तर निहार यांचे एलएलएम पर्यंत शिक्षण झाले असून त्यांनी वकिली (Advocate) व्यवसायात जम बसविला आहे. अंकिता यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये (London School of Economics) आणि एक वर्ष हार्वर्डमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या त्या सदस्या आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या विवाहाची चर्चा रंगली होती. अखेर हर्षवर्धन पाटील यांनी या दोघांच्या विवाहाची अधिकृत माहिती जाहीर केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

बिंदूमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन (Accidental death) झाले होते.
त्यांच्या निधनाचा बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व त्यांचे बंधू जयदेव हे निहार ठाकरे यांचे सख्ख्ये काका आहेत.
तर मनसे प्रमुख राज ठाकरे हे चुलत काका आहेत.
या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकत्र येणार आहेत.

 

Web Title :- Ankita Harshvardhan Patil | ankita harshvardhan patil will marry with nihar bindumadhav thackeray in mumbai Invited Raj Thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 74 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Railway Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत 1780 पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी सुविधा ! बर्थ रिकामे झाल्यास तुम्हाला येईल थेट मोबाईलवर SMS

 

Related Posts