IMPIMP

APY | सरकारच्या योजनेंतर्गत दरमहिना मिळेल 5000 रूपये पेन्शन, जाणून घ्या कुठे करावा लागेल अर्ज

by Team Deccan Express
Maharashtra Pension News | maharashtra government to give 20 thousand pension to kin of martyrs

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – APY | कमी गुंतवणुकीत पेन्शनच्या गॅरंटीसाठी ही सरकारी योजना चांगला पर्याय आहे. आता अटल पेन्शन योजनेच्या Atal Pension Yojna (APY) अंतर्गत सरकार 60 वर्षानंतर 1000 ते 5000 रुपये महिना पेन्शनची गॅरंटी देते. म्हणजे वार्षिक तुम्हाला 60,000 रूपये पेन्शन मिळेल. अटल पेन्शन योजनेचे फायदे. (APY)

 

60 वर्षानंतर मिळेल वार्षिक 60 हजार पेन्शन

योजनेंतर्गत अकाऊंटमध्ये दरमहिना एक ठराविक योगदान केल्यानंतर निवृत्तीनंतर 1 हजार रूपये ते 5 हजार रुपये मासिकपर्यंत पेन्शन (Monthly Pension Scheme) मिळेल. सरकार दर 6 महिन्यात केवळ 1239 रूपये गुंतवणूक केल्यास 60 वर्षाच्या वयानंतर आयुष्यभर 5000 रुपये महिना म्हणजे 60,000 रुपये वार्षिक पेन्शनची गॅरंटी सरकार देत आहे. (APY)

 

दरमहिना द्यावे लागतील 210 रुपये

सध्याच्या नियमानुसार, जर 18 वर्षाच्या वयात योजनेशी कमाल 5 हजार रूपये मासिक पेन्शनसाठी सहभागी झालात तर तुम्हाला दरमहिना 210 रूपये द्यावे लागतील. जर हेच पैसे दर तीन महिन्याला दिले तर 626 रूपये आणि 6 महिन्यात दिल्यास 1,239 रूपये द्यावे लागतील. महिन्यात 1000 रूपये मिळवण्यासाठी जर 18 वर्षाच्या वयात गुंतवणूक केली तर मासिक 42 रूपये द्यावे लागतील.

 

कमी वयात सहभागी झाल्यास जास्त फायदा

समजा जर 5 हजार पेन्शनसाठी वयाच्या 35 व्या वर्षी सहभागी झालात तर 25 वर्षापर्यंत दर 6 महिन्यात 5,323 रूपये जमा करावे लागतील. अशावेळी एकुण गुंतवणूक 2.66 लाख रूपये होईल, ज्यावर तुम्हाला 5000 रूपये मासिक पेन्शन मिळेल. तर वयाच्या 18 व्या वर्षी सहभागी झाल्यास तुमची एकुण गुंतवणूक 1.04 लाख रूपये होईल. म्हणजे एकाच पेन्शनसाठी सुमारे 1.60 लाख रूपये जास्त गुंतवावे लागतील.

 

या सरकारी योजनेची आणखी माहिती

– तुम्ही पेमेंटसाठी 3 प्रकारचा प्लान निवडू शकता. मंथली, तिमाही आणि सहामाही गुंतवणूक.

– इन्कम टॅक्सच्या कलम 80 सीसीडी अंतर्गत यामध्ये सूट मिळते.

– एका सदस्याच्या नावाने केवळ एकच खाते उघडता येईल.

– जर 60 वर्षाच्या अगोदर किंवा नंतर सदस्याचा मृत्यू झाला तर पेन्शनची रक्कम पत्नीला मिळेल.

– जर सदस्य आणि पत्नी दोघांचा मृत्यू झाला तर सरकार नॉमिनीला पेन्शन देईल.

 

Web Title :- APY | atal pension yojna apy will give you rupees 5000 monthly pension know about details

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts