IMPIMP

Arrest In MPID-Pune Police | कोट्यावधींची फसवणूक करणार्‍या मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार याला अटक; MPID च्या गुन्ह्यात समर्थ पोलिसांनी केला तिसरा आरोपी अटक

by sachinsitapure
Maulana so'aiba mainuddīna attara

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Arrest In MPID-Pune Police | जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या मुख्य आरोपीसह दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केल्यानंतर आता तिसरा आरोपीला अटक केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (वय ३७, रा. मस्जिद मोहल्ला बोपोडी) असे या मौलानाचे नाव आहे. यापूर्वी अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व रोया ऊर्फ सीमा अब्दुल हुसेन नईम आबादी (वय ३५, रा. कॅम्प) यांना अटक केली होती. (Arrest In MPID-Pune Police)

याप्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), रोया उर्फ सीमा नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियमन १९९९ चे कलम ३ चा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२० ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत रास्तापेठ येथे घडला. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे.

आरोपी मौलाना शोएब व नादीर हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी संगनमत करुन त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. याप्रमाणेच या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे गेल्या ४ महिन्यांमध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकूण ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

समर्थ पोलिसांनी १४ स्टॅम्प पेपर, हिलमिसट हार्मनी कॉम्प्लेक्सचे नोटरी केलेले ११ ॲग्रिमेंट, जनरल पॉवर ऑफ ॲटनीचे २ ॲग्रिमेट, २ स्टॅम्प पेर ॲफीडीव्हेट केलेले, सह निबंधक कार्यालयात केलेले ४ दस्त अशी कागदपत्रे जप्त केली आहे.

समर्थ पोलिसांनी मौलाना शोऐब आत्तार याने गुन्ह्यातील फसवणूकीच्या रक्कमेतून जंगम व स्थावर मालमत्ता खरेदी
केले असण्याची शक्यता आहे. त्याचा तपास करुन ती जप्त करायची आहे.
फिर्यादी हे धार्मिक असून अटक आरोपी व त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून फिर्यादी यांना मंतरलेले पाणी पाजून त्यांच्याकडून परतावा मागू नये, म्हणून त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या पाण्याबाबत अटक आरोपीकडे तपास करायचा आहे. शोऐब आत्तार याने गुंतवणुकदार नसलेल्या व्यक्तीना देखील मोठ्या प्रमाणावर रक्कमा ट्रान्सफर केल्याचे दिसत आहे. त्याबाबत पोलिस कस्टडीमध्ये सखोल तपास करणे आवश्यक आहे.

आरोपींनी डीझायनरा फॅशन या फर्मच्या नावे १ कोटी ९० लाख ५० हजार रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपी अफिफा शोएब आत्तार हिने तिच्या हनी एंटर प्रायजेय फर्मनावे एकूण ५२ लाख रुपये जमा करुन घेतल्याचे
तपासात निष्पन्न झाले आहे. अन्य आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आरोपीविरुद्ध कोंढवा, लष्कर पोलीस ठाण्यात आणखी
तीन गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्यांनी आणखी लोकांची आर्थिक फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही,
त्यामुळे त्यांच्याकडे सखोल तपास करायचा असल्याचे पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे
यांनी न्यायालयात केली. त्यानुसार न्यायालयाने मौलाना शोऐब आत्तार याला १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर
केली आहे.

समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश बंडगर, पोलिस निरीक्षक ( गुन्हे ) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गर्शनाखाली
तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे , ए .एस .आय भोसले, रहीम शेख, राईटर नीलम करपे , प्रफुल साबळे,
इम्रान शेख, ढमाले यांनी आरोपी अटक केले.

Related Posts