IMPIMP

Ashish Shelar | ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्रात जन्म झाला’, संजय राऊतांच्या विधानावर आशिष शेलार संतापले; म्हणाले…. (व्हिडिओ)

by nagesh
Ashish Shelar | bjp leader ashish shelar criticizes shivsena mp sanjay raut and uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. 14 एप्रिल 1891 साली महू येथे झाला होता. त्यावेळी कोणतेही राज्य अस्तित्वात नव्हते. त्या काळी मुंबई प्रांत हे एकच राज्य होते. त्यामुळे त्यांचा जन्म महाराष्ट्रातच झाला आहे. आता महू मध्यप्रदेशात असले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut ) म्हणाले होते. त्यावर मुंबई भाजपचे (Mumbai BJP) प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आक्षेप घेत, संजय राऊतांवर टीका केली आहे. शिवसेना डॉ. आंबेडकरांच्या जन्म स्थळावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेना (Shiv Sen), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांनी मिळून उद्या मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले आहे. याच्याविरोधात भाजपने देखील कंबर कसली असून, भाजप उद्या (दि. 17) ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

 

यावेळी शेलार म्हणाले, डॉ. आंबेडकरांच्या जन्म स्थाळावरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) पक्ष करत आहे. त्यांचा हा खटाटोप जाणीवपूर्वक सुरू असून, त्यामागील कारण अस्पष्ट आहे. एखादे संकट आल्यावर शेतकऱ्याला ज्याप्रमाणे ते आस्मानी आहे की सुलतानी असा प्रश्न पडतो, त्याप्रमाणे आंबेडकरांच्या जन्म स्थळावरून वाद निर्माण करून समस्त भारतीय नागरिकांवर अफगाणी संकट आणले आहे.

 

 

तालिबानाच्या भागात गौतम बुद्धांच्या (Gautama Buddha) प्रतिमांवर हल्ला केला होता. आता शांततापूर्ण आणि शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांचे अनुयायी आणि आमचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म स्थळावरून वाद निर्माण केला जात आहे. हे का सुरू आहे, हा आमचा प्रश्न आहे. असे आशिष शेलार म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आपले ज्ञान पाजळण्याची एकही संधी संजय राऊत सोडत नाहीत.
यांची मस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म स्थळापर्यंत गेली आहे.
अशी खोटी माहिती पसरवणे अक्षम्य चूक आहे. हा नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न आहे आणि भाजपला हे
मान्य नाही. आम्ही याचा निषेध करतो. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
सुषमा अंधारे (Sushma Andhare) या हिंदू धर्मातील देवतांचा आणि महाराष्ट्रातील संतांचा अपमान करत आहेत.
त्यावर उद्धव ठाकरे मौन सोडायला तयार नाहीत. उद्या कसले डोंबलाचे मोर्चे काढत आहात, असा प्रश्न शेलारांनी केला.

 

 

Web Title :- Ashish Shelar | bjp ashish shelar press conference protest shivsena sanjay raut mahaviikas aghadi

 

हे देखील वाचा :

Ashish Shelar | ‘मविआ’च्या मोर्चाला भाजप देणार ‘माफी मांगो’ आंदोलनाने उत्तर, आशिष शेलारांची माहिती (व्हिडिओ)

Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा भाजपाला इशारा; म्हणाल्या ‘तर मी सगळ्या भाजपवाल्यांची….’

Maharashtra Politics | ‘राज ठाकरे आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

 

Related Posts