IMPIMP

Ashish Shelar | ‘मविआ’च्या मोर्चाला भाजप देणार ‘माफी मांगो’ आंदोलनाने उत्तर, आशिष शेलारांची माहिती (व्हिडिओ)

by nagesh
Ashish Shelar | bjp also do protest againt mahavikas aghadi tomorrow in mumbai says ashish shelar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – महापुरुषांच्या अपमानाचा निषेध (Protest) करण्यासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उद्या
(शनिवार) महामोर्चाचं आयोजन केलेलं असताना आता भाजपाही (BJP) रस्त्यावर उतरणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish
Shelar) यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबईमध्ये ठिकठिकाणी ‘माफी मांगो’ (Mafi Mango) आंदोलन करणार असल्याचं
जाहीर केलं आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडीकडून आयोजित केलेल्या मोर्चाला भाजपही रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहे. महापुरुषांच्या अपमानावर बोलणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) वारकऱ्यांच्या अपमानाबाबत गप्प का आहेत? तसेच संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख केला. याबाबत काही बोलणार आहात का? आता आम्हीही ‘मविआ’ला रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहोत. उद्या मुंबई भाजपकडून (Mumbai BJP) ठिकठिकाणी ‘माफी मांगो’ आंदोलन केलं जाणार आहे. मविआच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले जातील. मुंबईतील सहा विभागातील खासदार (MP), आमदार (MLA) यामध्ये सहभागी होतील असं आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितलं.

 

 

संजय राऊतांवर (Sanjay Raut) निशाणा साधताना आशिष शेलार म्हणाले,
संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) जन्म महाराष्ट्रात
झाल्याचा उल्लेख केला. त्यामुळे आम्हाला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की,
आंबेडकरांचा जन्म नेमका कुठं झाला आहे. याचा अभ्यास त्यांना व्हावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची
दोन पुस्तकं राऊतांना भेट म्हणून पाठवणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ashish Shelar | bjp also do protest againt mahavikas aghadi tomorrow in mumbai says ashish shelar

 

हे देखील वाचा :

Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा भाजपाला इशारा; म्हणाल्या ‘तर मी सगळ्या भाजपवाल्यांची….’

Maharashtra Politics | ‘राज ठाकरे आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

Kiff 2022 | अमिताभ बच्चन यांच्या बद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले ‘हे’ मोठे विधान

Solapur Band | आज सोलापूर बंद; महाविकास आघाडीचा पाठिंबा

 

Related Posts