IMPIMP

Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा भाजपाला इशारा; म्हणाल्या ‘तर मी सगळ्या भाजपवाल्यांची….’

by nagesh
Sushma Andhare | shivsena leader sushma andhare claims opposition could kill me by accident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशापूर्वी शिवसेनेच्याच विरोधात अनेक भाषणे केली होती. त्यांच्या या जुन्या भाषणांचा हवाला आता सगळीकडे दिला जात आहे. त्यात एका ठिकाणी त्यांनी वारकरी संप्रदायाचा अपमान केल्याचा दावा विश्व वारकरी सेनेने केला होता. त्यातून दोन दिवसांपूर्वी विश्व वारकरी सनेने सुषमा अंधारे (Sushma Andhare) ज्या पक्षात असतील, त्या पक्षाला मत न देण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सुषमा अंधारेंच्या शिवसेनेतून राजीनाम्याची मागणी विश्व वारकरी सेनेतून जोर धरत आहे. त्यावर बोलताना सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) भाजपला पुन्हा एकदा धारेवर धरले आहे.

 

मी धारकऱ्यांची माफी मागणार नाही. मी वारकऱ्यांची माफी मागणार आहे. जे सच्चे वारकरी आहेत, त्यांच्या जर का माझ्या वक्तव्याने भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची माफी मागायला तयार आहे. माझ्या पक्षाने मला माफी मागण्यास सांगितले, तर मला माफी मागण्यात काही कमीपणा नाही. मी माफी मागायला तयार आहे. पण तरी देखील विरोध करत असतील, तर मला वेगळी भूमिका घ्यवी लागेल, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले. मी कुठूनही काम करायला तयार आहे. मी पक्षात राहून आणि पक्षाबाहेर राहूनही काम करू शकते. मी फ्रीलान्स काम करणे विरोधकांसाठी अधिक धोकादायक असू शकते. आता मी एका पक्षात काम करत आहे. त्यामुळे माझ्यावर काही बंधने आहेत. पण जर का मी फ्रीलान्समध्ये उतरले, तर सगळ्या भाजपवाल्यांची पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. मी काय करावे, मी पक्षात असावे की नाही, याचा निर्णय माझा पक्ष आणि पक्षप्रमुख घेतील, असेही अंधारे म्हणाल्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जे लोक माझ्या विधानांचा आणि जुन्या भाषणांचा आधार घेऊन राजीनाम्याची मागणी करत आहेत,
ते सर्व स्वंयघोषित किर्तनकार भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत का? ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला, त्याचे राजीनामे मागणार आहेत का? मंगलप्रभात लोढा, भगतसिंग कोश्यारी यांच्यावर बोलण्याची कोणाची हिंमत आहे का?, असे प्रश्न यावेळी अंधारेंनी उपस्थित केले.

 

 

Web Title :- Sushma Andhare | sushma andhare shivsena slams bjp targeting on warkari comments

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘राज ठाकरे आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

Kiff 2022 | अमिताभ बच्चन यांच्या बद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले ‘हे’ मोठे विधान

Manoj Prabhakar | मनोज प्रभाकर यांचा नेपाळ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

MP Sanjay Raut | भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे, संजय राऊतांचे चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर

 

Related Posts