IMPIMP

ASI Pandurang Laxman Wanjle | पुण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग लक्ष्मण वांजळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे पोलीस दलात (Pune Police) कार्यरत असणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडूरंग वांजळे (ASI Pandurang Laxman Wanjle) यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक (President’s Police Medal) जाहीर झाले आहे. वांजळे यांनी आजपर्यंत अनेक गुन्ह्यांचा तपास करुन गुन्हेगारांना अटक केली आहे. राज्यात गाजलेल्या संदीप मोहोळ हत्या प्रकरणात पांडुरंग वांजळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आरोपींना अटक केली होती. (ASI Pandurang Laxman Wanjle)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नुकत्यात उघडकीस आलेल्या आर्मी भरती परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाचा तपासात देखील वांजळे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. आर्मी भरती परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींचा दिल्ली येथे शोध घेऊन वांजळे (ASI Pandurang Laxman Wanjle) यांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पांडुरंग वांजळे हे सध्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकमध्ये कार्यरत आहेत.

 

2006 मध्ये झारखंडमधील ISI एजंट विशाल उपाध्यायला अटक करण्यात त्यांचा मोठा हात होता, विशालने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले होते. न्यायालयाने त्याला सहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. क्राइम ब्रँचमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 7 लाख 64 हजार रुपये किमतीची एकूण 42 पिस्टल आणि 75 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. 2014 ते 2018 या कालावधीत त्यांची नियुक्ती सिंहगड पोलीस ठाण्यात झाली होती. वांजळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 15 खून, पाच आर्म अ‍ॅक्ट प्रकरणे, सात दरोडे, पाच चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, खंडणीची प्रकरणे, वाहन चोरीची प्रकरणे आणि NDPS चे एक प्रकरणांचा यशस्वीरित्या तपास करुन आरोपींना अटक केली आहे. तसेच पुणे शहरातील गँगवॉर प्रतिबंध करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी अनेक टोळ्यांमधील कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पांडुरंग वांजळे यांनी आजपर्यंत 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळात वांजळे यांना 270 पुरस्कार मिळाले आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणारे गुणवत्तापूर्व सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
वांजळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर त्यांचे पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr. Ravindra Shisve), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge)
यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

पांडुरंग वांजळे यांनी आजपर्यंत मुख्यालय, समर्थ पोलीस स्टेशन (Samarth Police Station),
गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, वारजे पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station),
सिंहगड रोड पोलीस स्टेशन (Sinhagad Road Police Station), गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक -1 मध्ये काम केले आहे.

 

Web Title :- ASI Pandurang Laxman Wanjle | President’s Medal awarded to Pune Assistant Sub-Inspector of Police Pandurang Laxman Wanjale

 

हे देखील वाचा :

Pink Salt Tea | सर्दी, खोकला आणि डोकेदुखीने असाल त्रस्त तर आजच बनवा सैंधव मीठाचा चहा; शरीरात एनर्जी सुद्धा वाढवतो; डायबिटीज रूग्णांसाठी चांगली पसंत

LIC Jeevan Labh Policy | दररोज 252 रुपयांची करा गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये; जाणून घ्या

SBI ची बेस्ट योजना ! घरबसल्या महिन्याला कमवू शकता 60 हजार रुपये; जाणून घ्या

 

Related Posts