IMPIMP

Asia Cup 2023 | आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार ! टीम इंडियाच्या सामन्यांबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

by nagesh
 Asia Cup 2023 | pakistan-host-asia-cup-2023-team-india-all-matches-in-other-venue-pcb-solution-to-asia-cup-logjam-ind-vs-pak-match

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : मागच्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट (IND Vs PAK Cricket Match) बोर्डांमध्ये आशिया कप 2023 (Asia Cup 2023) वरून मोठ्या प्रमाणात वाद होते. यंदाच्या आशिया चषक 2023 चे (Asia Cup 2023) यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले होते. मात्र भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन आशिया कप खेळणार नाही असे बीसीसीआयचे सचिव जय शहा (BCCI Secretary Jai Shah) यांनी आधीच स्पष्ट केले होते. यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) देखील यंदा भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सामील न होण्याची धमकी दिली होती. अखेर आता या सगळ्या वादावर तोडगा काढण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय निघाला तोडगा?

यंदाचा आशिया चषक जरी पाकिस्तानमध्ये होणार असला तरी भारताविरुद्धचे सामने पाकिस्तानऐवजी तटस्थ देशात होणार आहेत. भारताचे सामने कोणत्या मैदानावर होणार हे अद्याप ठरलेले नाही. आशिया कप आयोजित करण्यासाठी पीसीबीने हा उपाय शोधला आहे. भारतीय संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळू शकेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सहा देशांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. या दोघांशिवाय या गटात एक पात्रता संघ असणार आहे तर दुसऱ्या गटात श्रीलंका (Sri Lanka Cricket Team), बांगलादेश (Bangladesh Cricket Team) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan Cricket Team) संघाचा समावेश आहे. (Asia Cup 2023)

कशाप्रकारे पार पडणार सामने?

आशिया चषक स्पर्धेत केवळ 6 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान गतविजेता श्रीलंका, बांगलादेश आणि एका पात्रता संघाचा समावेश असणार आहे. हे सर्व संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत 6 संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत. यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. यानंतर उपांत्य फेरीत 4 संघांमध्ये राऊंड पद्धतीने एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर गुणतालिकेत टॉपवर असणाऱ्या संघांमध्ये फायनलचा सामना रंगणार आहे. या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 3 सामने होण्याची शक्यता आहे. यंदाची आशिया चषक स्पर्धा 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या दरम्यान पार पडणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Asia Cup 2023 | pakistan-host-asia-cup-2023-team-india-all-matches-in-other-venue-pcb-solution-to-asia-cup-logjam-ind-vs-pak-match

हे देखील वाचा :

Congress Leader Rahul Gandhi | खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी’

Pune Lohegaon International Airport | पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ‘समर शेड्यूल’, प्रथमच 200 हून अधिक प्रवासी उड्डाणांना हवाई दलाची परवानगी

Pune Congress Mohan Joshi On BJP | भाजपच्या पराभवाचे आता ‘अंतिम काऊंटिंग’ सुरु; ‘भाजपाला विनाशकाले विपरीत बुद्धी’ – मोहन जोशी

Related Posts