IMPIMP

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! म्हटले – ‘कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर दुसर्‍या पत्नीपासून झालेले मुल अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र’

by nagesh
Maharashtra Politics | maharashtra politics supreme court direct to election commission of india dont take any decision on shivsena election symbol

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) गुरुवारी म्हटले की, मृत कर्मचार्‍याच्या दुसर्‍या पत्नीपासून (Second Wife) जन्मलेले मुल अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी (Compassionate Appointment) पात्र आहे. कोर्टाचे म्हणणे होते की, कायद्याच्या आधारावरील कोणत्याही धोरणात वंशासह इतर आधारावर भेदभाव केला जाऊ नये. न्यायालयाने म्हटले, अनुकंपा नियुक्ती कलम 16 (Article 16) अंतर्गत घटनात्मक हमीचा अपवाद आहे, परंतु अनुकंपा नियुक्तीचे धोरण घटनेच्या कलम 14 आणि 16 नुसार असावे. (Supreme Court)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे प्रकरण
न्यायमूर्ती यू. यू. ललित (Justice U. U Lalit), न्यायमूर्ती एस. रवींद्र भट (Justice S. Ravindra Bhat) आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह (Justice P. S. Narasimha) यांच्या खंडपीठाने अनुकंपा नियुक्तीच्या बाबत एक मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने 18 जानेवारी 2018 चा पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळला.

 

कोर्टाने म्हटले, मुकेश कुमार यांच्या अनुकंपा नियुक्ती योजनेंतर्गत केवळ यासाठी विचार करण्यास नकार देता येणार नाही कारण तो दुसर्‍या पत्नीचा मुलगा आहे. रेल्वेच्या सध्याच्या धोरणानुसार त्याच्या प्रकरणावर विचार करण्याचे निर्देश दिले जात आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय होती कोर्टाची टिप्पणी
तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले, अधिकार्‍यांना हे जाणून घेण्याचा अधिकार असेल की, अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज कायद्यानुसार इतर सर्व आवश्यकता पूर्ण करत आहे किंवा नाही. (Supreme Court)

 

अर्जावर विचार करण्याची प्रक्रिया आजपासून तीन महिन्याच्या कालावधीच्या आत पूर्ण केली जाईल. कोर्टाने म्हटले, कायद्याच्या आधारावर अनुकंपा नियुक्तीच्या धोरणात वंशानुक्रमासह कलम 16(2) मध्ये वर्णन केलेल्या कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाऊ नये. याबाबत, ’वंशा’त एखाद्या व्यक्तीच्या कौटुंबिक मुळास सहभागी करण्यासाठी समजून घेतले पाहिजे.

 

काय होती याचिकर्त्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाच्या या तथ्यांचा उल्लेख केला की, जगदीश हरिजन 16 नोव्हेंबर 1977 रोजी नियुक्त भारतीय रेल्वेचे कर्मचारी होते.
आपल्या जीवनकाळात त्यांच्या दोन पत्नी होत्या. गायत्री देवी त्यांची पहिली पत्नी होती आणि कोनिका देवी दूसरी पत्नी होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याचिकाकर्ता मुकेश कुमार दूसरी पत्नीपासून जन्मलेले पुत्र आहेत.
हरिजन यांचा 24 फेब्रुवारी 2014 ला सेवेत असताना मृत्यू झाला होता.
यानंतर ताबडतोब गायत्री देवी यांनी 17 मे 2014 रोजी एक अर्ज देऊन
आपला सावत्र मुलगा मुकेश कुमार यास योजनेंतर्गत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची मागणी केली.

 

का फेटाळला अर्ज
केंद्राने 24 जून 2014 ला अर्ज फेटाळला आणि म्हटले की, कुमार हे दूसर्‍या पत्नीचा मुलगा असल्याने अशा नियुक्तीचा त्यांना अधिकार नाही.
केंद्रीय प्रशसकीय प्राधिकरण आणि पाटणा उच्च न्यायालयात दाखल याचिकासुद्धा फेटाळण्यात आल्या.
त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
प्रकरणात वकिल मनीष कुमार सरन यांनी याचिकाकर्त्याकडून आणि वकील मीरा पटेल यांनी केंद्राकडून आपली बाजू मांडली.

 

Web Title :- Supreme Court | supreme court on compassionate appointment on pil from railway worker second wife for stepson

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Rates Today | …म्हणून सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किंमतीत तब्बल 3 हजार रूपयांची घसरण

Maharashtra Police | राज्यातील हजारो पोलिसांसाठी खुशखबर ! पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; PSI बनणार, शासन निर्णय जारी

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 67 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts