IMPIMP

ATM Withdrawal Charges Rules | आजपासून ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार जास्त चार्ज ! बँक लॉकर आणि PF शी संबंधित नियमही बदलले; जाणून घ्या

by nagesh
Pune Crime | A 76-year-old man was duped on the pretext of helping him withdraw money from an ATM in Kothrud

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ATM Withdrawal Charges Rules | नवीन वर्षाच्या सुरवाती बरोबर देशात एटीएममधून पैसे काढणे (ATM Withdrawal Charges Rules), बँक लॉकर (Bank Locker) आणि EPF कॉन्ट्रीब्यूशनशी संबंधित नियमांमध्ये केलेले बदल देखील लागू करण्यात आले आहेत. फ्री ट्रांसजेक्शन (Free Transaction) केल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्याचे चार्ज वाढवण्यात आले आहे. बँक लॉकर बाबत बँकांची जबाबदारीही वाढवण्यात आली. यासोबतच ईपीएफ योगदानासाठी खातेदारांचे आधार कार्ड (Aadhaar Card) अनिवार्य करण्यात आले आहे. (ATM Withdrawal Charges Rules)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ATM Withdrawal charge

RBI ने 10 जून 2021 रोजी एक जाहीर घोषणा केली होती, त्यानुसार, 1 जानेवारी 2022 पासून, बँकांना मासिक मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या
मर्यादेपलीकडे प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपयांऐवजी 21 रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली होते. तसेच आजपासून (ATM Withdrawal
Charges Rules) त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तथापि, ग्राहक त्याच्या स्वत:च्या बँकेच्या एटीएममधून 5 वेळा मोफत पैसे काढण्याची
मर्यादा आणि इतर बँकेच्या एटीएममधून 3 वेळा मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेचा लाभ घेत राहतील.

 

 

Bank Locker Rules

बँक लॉकर्सबाबत बँकांची जबाबदारी वाढली आहे. RBI च्या 18 ऑगस्ट 2021 च्या अधिसूचनेनुसार, 1 जानेवारी 2022 पासून, बॅंका त्यांच्या कर्मचार्‍यांनी लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या नुकसानीची जबाबदारी चोरी किंवा फसवणुकीमुळे टाळू शकत नाहीत. भारताच्या मध्यवर्ती बँकेने अशा नुकसानासाठी बँकेचे दायित्व चालू वार्षिक बँक लॉकर भाड्याच्या 100 पटीने ठेवले आहे.

 

 

EPF Contribution

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांचा आधार क्रमांक आणि EPF खाते लिंक करणे अनिवार्य होते. तसे न झाल्यास कंपनीचे पीएफ खात्यातील योगदान बंद केले जाईल. अशा परिस्थितीत, ज्यांनी त्यांचे आधार कार्ड आणि पीएफ खाते लिंक केलेले नाही, कंपनीने या महिन्यासाठी केलेले पीएफ योगदान त्यांच्या खात्यात येणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title : atm withdrawal charges rules changes bank locker epf contribution new rules

 

हे देखील वाचा :

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकने अवघ्या 9 महिन्यात गुंतवणुकदारांना बनवलं करोडपती, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

IPS Ankita Sharma | ही आयपीएस महिला प्रसिध्दीच्या झोतात… हातामध्ये AK-47 घेऊन नक्षलवाद्यांच्या विरूध्द करते ऑपरेशन

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर

 

Related Posts