IMPIMP

IPS Ankita Sharma | ही आयपीएस महिला प्रसिध्दीच्या झोतात… हातामध्ये AK-47 घेऊन नक्षलवाद्यांच्या विरूध्द करते ऑपरेशन

by nagesh
IPS Ankita Sharma | police and intelligence story ankita sharma woman ips officer chhattisgarh naxalite maoist bastar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था IPS Ankita Sharma । छत्तीगड (Chhattisgarh) हे अनेक वर्षांपासून नाक्षलवाद्यांचा त्रास सहन करत आहे. बस्तर (Bastar) मध्ये नक्षलवाद्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. परंतु गेल्या काही वर्षात हे दृश्यच बदलले आहे. जवानांच्या सततच्या मोहिमेमुळे नक्षलवादी हळुहळू येथे बॅकफूटवर जात आहेत. नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी महिला अधिकारीही (Female officer) आपले महत्त्वाचे योगदान देत आहेत. अशाच एका महिला IPS अधिकारी अंकिता शर्मा (IPS Ankita Sharma) यांच्याकडे नक्षल ऑपरेशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2018 च्या बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या अंकिता यांना राज्य सरकारने (State Government) नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये तैनात केले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

IPS अंकिता शर्मा नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेमध्ये तैनात

अंकिता मोकळ्या वेळेत तरुणपिढीला मार्गदर्शन करतात. राज्याची पहिली महिला IPS होण्यासाठी त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. म्हणूनच त्यांनी ठरवले की जो त्रास तिला सहन करावा लागला तो इतर कोणत्याही विद्यार्थ्याला होऊ नये. यासाठी त्या स्वत: ऑनलाइन टिचिंग करत आहेत. त्यांना परिसरात चांगलीच प्रसिध्दी मिळतेय.

आतापर्यंत त्यांनी 100 हुन जास्त तरुणांना UPSC परीक्षेसाठी मदत केली आहे. त्या आठवड्यातून एकदा आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी करतात व त्यांच्या समस्येवर तोडगा देखील काढतात. अंकिता यांना घोडेस्वारी (Horse riding) व बॅडमिंटनचा (badminton) छंद आहे. सोशल मीडियावर त्या नेहमीच फोटो पोस्ट करत असतात.. सध्या तर त्या बस्तर मध्ये आहेत.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अंकिता हातात AK-47 घेऊन दऱ्याखोऱ्यात.. शोध माहीम….

छत्तीसगड मधील दुर्ग जिल्ह्यात जन्मलेल्या अंकिता शर्मा 2018 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. IPS झाल्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग रायपूर
(raipur) मध्ये नगर पोलीस अधीक्षक पदासाठी झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना प्रमोशन देऊन बस्तर मध्ये IPS पदासाठी प्रमोट केले.
अंकिता बस्तरच्या नक्षलग्रस्त दर्भा, तुलसी डोगरी, कोलेंग, टोंगपाल भागात पोलिस आणि सीआरपीएफ जवानांसह सर्च ओप्रेशनसाठी जातात..

 

 

भौगोलिकदृष्ट्या हा परिसर पर्वतीय, नदी, नाले आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. जागोजागी भीती आणि कुठूनही केव्हाही हमला होण्याचा धोका आहे. तरीही त्या बेधडकपणे नक्षलवाद्यांचे ताडे उधळून लावतात. महिला अधिकारी अंकिता शर्मा (IPS Ankita Sharma)अनेक किलोमीटर दर्‍यातून चालत जाऊन नक्षलवादाशी लढा देत आहेत.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

३० वर्षांच्या अंकिता तीन भावंडांमध्ये सर्वात मोठ्या  आहेत. वडील दुर्ग मधील मोठे व्यापारी आहेत व आई गृहिणी आहे. लुक बरोबरच त्या दबंग अधिकारी म्हणून देखील ओळखल्या जातात. त्यांनी दुर्ग मध्ये ग्रॅजुएशन नंतर MBA केले. नंतर IPS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. IPS अंकिता सांगतात की ट्रेनिंग दरम्यान स्त्री आणि पुरुष यांच्यातील फरक दूर केला जातो.

अंकिता यांना नेहमी बस्तर मध्ये काम करायला आवडते.
जेव्हा इथे पोस्टिंग मिळाले तेव्हा त्यांना खूप काही नवीन शिकायला भेटले.
विशेषत: नक्षलग्रस्त भागात चांगल्या अधिकाऱ्यांकडून खूप काही शिकायला मिळाले आहे, असे अंकिता सदैव सांगतात.

 

 

Web Title : IPS Ankita Sharma | police and intelligence story ankita sharma woman ips officer chhattisgarh naxalite maoist bastar

 

हे देखील वाचा :

Get Rid Anemia Fatigue And Weakness Eating These Foods | हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर

Schools Fees Reduction | शालेय शिक्षण विभागाच्या ‘शुल्क कपाती’च्या शासन निर्णयावर कोर्टाची सरसकट स्थगिती नाही

Restrictions in Pune | कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूला अटकाव घालण्यासाठी पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध

 

Related Posts