IMPIMP

Atul Bhatkhalkar | ‘पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात…त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे’, भाजप आमदाराचा शरद पवारांना टोला

by nagesh
Maharashtra Politics | bjp mla atul bhatkhalkar demand to investigate role of ncp chief sharad pawar in patrachal case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर चुकीच्या पद्धतीने व राजकीय हेतूने कारवाई केली आहे. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना यातना देण्याचा प्रयत्न जाणुनबुजून केला जात आहे. परंतु याविरोधात राष्ट्रवादी संघर्ष करणार असल्याची भूमिका पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत मांडली. तसेच नवाब मलिक यांचा राजीनामा (Resignation) घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर भाजप आमदार (BJP MLA) अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करुन पवारांवर निशाणा साधला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शरद पवार म्हणाले की, 20 वर्षे महाराष्ट्राच्या विधानसभेत (Maharashtra Legislative Assembly) नवाब मलिक आहेत. त्या सर्व काळात कधी असे चित्र दिसले नाही मात्र आताच दिसले. एखादा मुस्लिम (Muslim) कार्यकर्ता दिसला की त्याला दाऊदचा (Dawood Ibrahim) जोडीदार बोलायचं. कारण नसताना हा आरोप केला जातोय. मला याची चिंता नाही करण कधीकाळी माझ्यावरही आरोप झाले. हे लोक यापद्धतीने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्याची चिंता करण्याचे कारण नाही असा टोला पवारांनी भाजपचं नाव न घेता लगावला. शरद पवारांच्या विधानानंतर भाजपने देखील त्यांना प्रतिटोला लगावला आहे.

 

 

भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांचा एक फोटो ट्विट केला आहे. ट्विटमध्ये ते म्हणाले पवारसाहेब ज्याचा हात घट्ट धरतात… त्याची हमखास विकेट जाते, हा इतिहास आहे, असा सणसणीत टोला अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, मलिक यांना मंत्रिमंडळातून काढा असा आग्रह भाजपने केला आहे. मात्र त्यांना अटक झाली म्हणून का काढा ? कबूल आहे त्यांना अटक झाली मात्र सिंधुदुर्गातील (Sindhudurg) एक जुने सहकारी नारायण राणे (Narayan Rane) यांनाही अटक (Arrest) झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रिमंडळातून (Cabinet) कमी करण्याचा निर्णय कुणे घेतला हे पाहण्यात किंवा वाचण्यात आले नाही. एक न्याय नारायण राणे यांना लावता आणि दुसरा न्याय नवाब मलिक यांना लावला याचा अर्थ हे सगळं राजकीय हेतूने केले जात आहे.

 

Web Title :- Atul Bhatkhalkar | bjp leader atul bhatkhalkar has taunt to ncp leader sharad pawar

 

हे देखील वाचा :

BSNL Plan | BSNL चा ‘हा’ स्वस्त प्लान Airtel-Vi-Jio वर पडतोय भारी, फक्त 7 रूपयांमध्ये दररोज मिळतोय 5 GB डेटा-कॉलिंग; जाणून घ्या

Devendra Fadnavis | ‘…तर अजित पवार यांना फासावर द्याल का?’; ‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस सभागृहात संतापले.

LIC Dhan Rekha Plan | एलआयसीची ‘ही’ पॉलिसी जबरदस्त ! 90 दिवसापासून 55 वर्षापर्यंची व्यक्ती सुद्धा करू शकते गुंतवणूक, कर्जासह 125 टक्के ‘सम अश्युर्ड’चा सुद्धा लाभ

 

Related Posts