IMPIMP

IND vs BAN | बांग्लादेशविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा, पाऊसाचा व्यत्यय येणार का?

by nagesh
IND Vs BAN Weather Report | india vs bangladesh 35th match pitch report in marathi adelaide oval adelaide weather forecast report live

सरकारसत्ता ऑनलाईन  – IND vs BAN | टीम इंडिया सध्या रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड (T20 World Cup) कपमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत भारताचा पुढील सामना बुधवारी बांग्लादेशविरुद्ध (Bangladesh) होणार आहे. भारताने विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तान (Pakistan), नेदरलँड (Netherlands) यांना हरवून धडाक्यात केली मात्र रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पराभवामुळे भारताची विश्वचषकातील स्थिती काहीश अवघड झाली आहे. यामुळे भारताला आता बांग्लादेशविरुद्ध विजय (IND vs BAN) मिळवावा लागणार आहे. मात्र या सामन्यात जर पावसाने व्यत्यय आणला तर याचा फटका या दोन्ही संघाना बसणार आहे. कारण सामना पावसामुळे अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघाना 1-1 गुण मिळेल, ज्यामुळे भारत स्प्धेत अधिक आघाडी घेऊ शकणार नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भारत आणि बांग्लादेश हे संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड मैदानात (Adelaide Grounds) आमने – सामने येणार आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा ठरणार आहे. याच महत्त्वाच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यास दोन्ही संघाना तोटा होऊ शकतो.

 

 

अ‍ॅडलेडची बुधवारची हवामानाची स्थिती?

हवामान खात्यानुसार, सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची तब्बल 95 टक्के शक्यता आहे. याशिवाय 25-30 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने वारे वाहतील. दरम्यान पावसाची दाट शक्यता असल्याने क्रिकेट रसिक नाराज असून भारतासाठी हा सामना रद्द झाल्यास पुढे पोहोचणे अवघड होणार आहे. (IND vs BAN)

 

 

पावसाने सामना रद्द झाल्यास काय?

टी20 विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे इंडिया आणि बांग्लादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात येणार आहे.

 

 

दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग XI

संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार) Rohit Sharma (captain), केएल राहुल (KL Rahul), विराट कोहली(Virat Kohli),
सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav), अक्षर पटेल (Akshar Patel), हार्दिक पांड्या (Hardik Pandya),
ऋषभ पंत (विकेटकीपर) (Rishabh Pant,wicketkeeper), रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin),
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), मोहम्मद शमी (Mohammad Shami),
अर्शदीप सिंह (Arshdeep Singh)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संभाव्य बांग्लादेशचा संघ
नजमुल हुसैन शान्तो (Najmul Hussain Shanto), सौम्या सरकार (Soumya Sarkar), लिटन दास
(Liton Das), शाकिब अल हसन (कर्णधार) (Shakib Al Hasan,captain), अफिफ हुसैन (Afif Hussain) ,
यासिर अली (Yasir Ali), मोसादेक हुसैन (Mossadeq Hussain) , नूरुल हसन (विकेटकीपर)
Nurul Hasan (wicketkeeper) , मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman), हसन महमूद
(Hasan Mahmood), तस्कीन अहमद (Taskeen Ahmed)

 

 

Web Title :-  IND vs BAN | will there be rain in india vs bangladesh t20 world cup 2022 match know adelaide weather

 

हे देखील वाचा :

Heart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे

कर्मचार्‍यांसाठी महत्वाची बातमी! EPFO बोर्डाने पेन्शन योजनेत केले बदल, जाणून घ्या कोणाला होणार फायदा?

Tulsi Benefits | चमत्कारी आहेत ‘या’ तुळशीचे फायदे, जाणून घ्या कसा करावा वापर

 

Related Posts