IMPIMP

Balasaheb Thorat | राधाकृष्ण विखेंच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

by nagesh
Balasaheb Thorat | balasaheb thorats reply to radhakrishnavikhe patils criticism

संगमनेर : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कराडमध्ये बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर टीका केली होती. त्यावर सोमवारी संगमनेर येथे झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे एकट्याने खिंड लढवू असे म्हणाले होते. पण आता त्यांनी स्वतःच पळ काढला आहे. असे विधान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी कराड येथे पत्रकारांशी बोलताना केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यावर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथील कार्यक्रमानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री विखे-पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘अगोदर विखे-पाटील पळाले, नंतर मी एकट्याने खिंड लढवली. २०१९ मध्ये अगोदर हे पळाले. ते खरंतर विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी त्या पद्धतीने महाराष्ट्राची काँग्रेसच तर सांभाळली नाही. परंतु जेव्हा लढण्याची वेळ आली त्यावेळी ते पळून गेले. आता ते माझ्यावर कशाला आरोप करत आहेत.’ अशा शब्दात त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना सुनावले.

 

तर, ‘या सर्व पक्षांतर्गत चर्चा असतात, आणि या अखंडपणे सुरू असतात, कोणत्याही पक्षात सुरूच असतात. फक्त आमच्या या चर्चेला तुम्ही खूपच चांगली प्रसिद्धी दिली. तुमचे आभार मानले पाहिजे. जे झालं त्याबाबत माझ्या ज्या भावना होत्या त्या मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या होत्या. त्यांनी त्या पद्धतीने दखल घेतली आहे. एच. के. पाटील (H. K. Patil) काल आले होते आमची चर्चा झालेली आहे. सगळ्या गोष्टी आहेत त्या पक्ष पुढे जाण्यासाठीच आहे.’ असे देखील यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

 

महाविकास आघाडीला महाराष्ट्रात अत्यंत अनुकुल वातावरण आहे.
आणि या वातावरणात ज्या निवडणुका होतील त्या महाविकास आघाडीला (MVA) चांगल्या यश देणाऱ्या ठरतील.
अशा विश्वास देखील यावेळी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, कराड येथील कार्यक्रमामध्ये बोलताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले होते की, ‘
२०१९ मध्ये काँग्रेस वाचवण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार, असं सांगणारे व एकाकी
खिंड लढवणार असं म्हणत मिरवणारे आता का हतबल झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात
समाधान मानलं आहे.’ अशी टीका त्यांनी नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर केली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Balasaheb Thorat | balasaheb thorats reply to radhakrishnavikhe patils criticism

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | 74 वर्षाच्या पत्नीने 78 वर्षाच्या पतीविरुद्ध केली फसवणुकीची तक्रार; शिवाजीनगर पोलीस ठाण्यात FIR

Pune Weather News | पुण्यात पुन्हा वाढला गारठा; किमान तापमान गेले सिंगल डिजिटमध्ये, आल्हाददायक वातावरणाचा अनुभव

 

Related Posts