IMPIMP

Balasaheb’s Shivsena | डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवरुन ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’ गटात मोठा वाद

by nagesh
Balasaheb's Shivsena | There is a big dispute between 'Balasaheb's Shiv Sena' and 'Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray' over the central branch in Dombivli

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shivsena) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांच्यात डोंबिवलीची मध्यवर्ती शाखा नेमकी कोणाची, यावरून वाद सुरु झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी या वादाला सुरुवात झाली होती. या शाखेचे सामंजस्याने दोन भाग करण्यात आले आहेत. मात्र, आज सकाळी (दि. 27) पुन्हा एकदा हा वाद उफाळला असून ही शाखा आमचीच आहे, असा दावा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) (Balasaheb’s Shivsena) करत आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

 

यातील विशेष बाब म्हणजे कोरोना कालखंडाच्या आधीपासून या शाखेच्या जागेच्या विक्री करण्याचे काम सुरू होते.
आता ही जागा अधिकृतपणे आमच्या नावावर झाल्याचा दावा शिंदे गटातील (Balasaheb’s Shivsena) कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
ही शाखा बाळासाहेबांच्या शिवसेनेची असल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी शिंदे गटातील लोकांनी शाखा ताब्यात घेतल्यानंतर ठाकरे गटातील महिला कार्यकर्त्यांनी शाखेवर मोठा मोर्चा नेत गोंधळ घातला.
त्यामुळे या शाखेवर तणावाचे वातावरण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

 

याबद्दल शिंदे गटाचे शाखाप्रमुख राजेश मोरे (Rajesh More) यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना म्हणाले,
आम्ही खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वात अनेक वर्षे येथे काम करत आहोत.
आता आम्ही या वास्तूच्या जागेचा रीतसर व्यवहार केला असून, शाखा आमच्या ताब्यात आली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना माध्यामातून आम्ही कार्य करत राहणार आहोत, असे मोरे म्हणाले.

 

त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे वाद उफाळून आला आहे.
शिंदे यांच्या समर्थकांनी शाखेवर ताबा मिळविल्याने ठाकरे यांचे समर्थक आक्रमक झाले होते.
त्यांनी शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

 

Web Title :- Balasaheb’s Shivsena | There is a big dispute between ‘Balasaheb’s Shiv Sena’ and ‘Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray’ over the central branch in Dombivli

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

Bacchu Kadu | रवी राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मी 50 खोके घेतल्याचे पुरावे नाही दिले, तर आम्ही… – बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

NCP MLA Nilesh Lanke | राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

Shahajibapu Patil | 1999 चा किस्सा सांगत शहाजीबापू पाटील यांची शरद पवारांवर टीका, म्हणाले- ‘त्या’ गोष्टीचे शल्य आयुष्यभर बोचत राहील’

Related Posts