IMPIMP

Baramati To Jejuri Journey | बारामती-जेजुरी प्रवास 35 मिनिटांत होणार

by nagesh
Baramati To Jejuri Journey | baramati jejuri distance can now be covered in 35 minutes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Baramati To Jejuri Journey | बारामती ते जेजुरी (Baramati To Jejuri Journey) हे 50 किलोमीटरचे अंतर (Distance) आता अवघ्या 35 मिनिटात पार होणार आहे. हायब्रीड अन्युईटी (हॅम) योजनेअंतर्गत जेजुरी ते नीरा नरसिंगपूर (Jejuri to Nira Narsinghpur) या रस्त्याचे काम सुरु आहे. यामध्ये जेजुरी ते मोरगाव (Jejuri to Morgaon) हा टप्पा पूर्ण झाला असून आता मोरगाव ते का-हाटीपर्यंत (Morgaon to Ka-hati) रस्त्यावरील डांबरीकरणाचा शेवटचा थर टाकून पूर्ण झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे (Anil Dhepe) यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.एच. खत्री कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. यांच्या मार्फत डांबरीकरणाचे उत्तम काम सुरु आहे. बारामती ते जेजुरी हा प्रवास आगामी काही दिवसामध्ये कमालीचा सुखकर होणार आहे. रात्रीच्या वेळेस अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने होणारे अपघात थर्मो प्लास्ट पट्टे आखल्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. (Baramati To Jejuri Journey)

 

दरम्यान, का-हाटी ते बारामती पर्यंतचे काम आगामी पंधरवड्यात संपणार असून त्या नंतर महिन्याभरात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि मधोमध थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे आखून त्यावर कॅटआईज (रिफेल्कटर असलेले लहान चौकोनी प्लॅस्टिकचे तुकडे) बसविले जाणार आहेत. त्याव्यतिरिक्त अवघड व तीव्र वळणावर गाडी रस्त्याच्या खाली जाऊ नये यासाठी संरक्षक जाळी देखील उभारली जाणार आहे.

 

Web Title : Baramati To Jejuri Journey | baramati jejuri distance can now be covered in 35 minutes

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Election 2022 | इच्छुकांना तयारीला लागण्याचा मार्ग मोकळा ! पुणे महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर, लवकरच आरक्षण सोडत जाहीर होणार

Delhi Fierce Fire | दिल्लीत इमारतीला भीषण आग; 26 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना होणार फायदा, सरकारने घर खरेदी करण्यासाठी दिला मोठा दिलासा

 

Related Posts