IMPIMP

Barsu Refinery Project | बारसूतील आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांचे चर्चेचे आवाहन, मात्र ग्रामस्थांनी फिरवली पाठ

by nagesh
Barsu Refinery Project | protest in barsu refinery project suspended for three days protestors left in front of district collector of ratnagiri

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाईन  – रिफायनरी विरोधात बारसूमध्ये (Barsu Refinery Project) सुरु असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना (Barsu Refinery Project) चर्चेचे आवाहन केले. परंतु ग्रामस्थांनी याला विरोधकरत पाठ फिरवली.

 

दरम्यान, रिफायनरी विरोधात बारसूमध्ये सुरु असलेले आंदोलन आता तीन दिवसांसाठी स्थगित केल्याची घोषणा स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्याचबरोबर जर तीन दिवसांत माती परीक्षण (Soil Test) थांबले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी (Collector) त्याठिकाणी आले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून ठोस काह घोषणा होत नसल्याने आंदोलक त्यांच्या समोरून निघून गेले. राजापूरमध्ये देखील दोन तास संवाद साधला होता. प्रशासन तुमच्या सोबत आहे, समस्यांवर मार्ग निघू शकतो. प्रतिनिधींची नावे द्या, आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधू असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी बोलणं थांबवलं.

 

माती परीक्षण तीन दिवसांत थाबवा. तीन दिवसांत माती परीक्षण थांबले नाही तर पुन्हा आंदोलन सुरु होईल. तीन दिवसांत पुन्हा चर्चा झाली नाही तर आंदोलन करणार असे स्थानिक नेते काशिनाथ गोरले (Kashinath Gorle) यांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Barsu Refinery Project | protest in barsu refinery project suspended for three days protestors left in front of district collector of ratnagiri

 

हे देखील वाचा :

TDM Marathi Movie | पैसावसूल ! रोमान्स, ऍक्शन अन् कॉमेडीचा तडका असलेला ‘टीडीएम’ प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने पाहावाच

Barsu Refinery Project | ‘खोटे गुन्हे दाखल करुन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर…’, बारसू प्रकरणावरुन काँग्रेसचा सरकारला इशारा

CM Eknath Shinde | बारसू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले-‘स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प करणार नाही’ (व्हिडिओ)

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

 

Related Posts