IMPIMP

CM Eknath Shinde | बारसू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले-‘स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प करणार नाही’ (व्हिडिओ)

by nagesh
CM Eknath Shinde | more than 70 percent people agree to barsu refinery project says cm eknath shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Survey) स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. माती परिक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी ग्रामस्त एकवटले होते. त्यामुळे त्याठिकाणची परिस्थिती चिघळल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र हे सर्व दावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फेटाळून लावले आहेत. शुक्रवारी मध्यमांना प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तेथील परिस्थितीबाबत माहिती दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प आणून त्यांच्यावर अन्याय करणार नाही. ग्रामस्थांवर अन्याय करुन प्रकल्प (Ratnagiri Refinery Project) पुढे न्यायचा नाही, अशी सरकारची भूमिका आहे. येथील 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचं प्रकल्पाला समर्थन असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

 

 

लाठीचार्ज केलेला नाही

शिंदे पुढे म्हणाले, मी स्वत: उद्योगमंत्र्यांशी बोललो आहे. पोलीस अधिकारी, अधीक्षक (Superintendent of Police) यांच्याशी चर्चा झाली आहे. तिथे आता शांतता आहे. स्पॉटवर आता कोणी नाही. काही लोक तिथे आले होते, दहा पंधरा मिनिटे त्यांसोबत पोलिसांनी चर्चा केली. सध्या शांतता असून लाठीचार्ज (Lathi Charged) केलेला नाही, असं जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

 

70 टक्के लोकांचे समर्थन

हे सर्व भूमिपूत्र असून गावकरी आहेत. त्यांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प, त्यांच्यावर अन्याय करुन पुढे न्यायचा नाही, अशी भूमिका सरकारची आहे. 70 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचं समर्थन आहे. काही लोक स्थानिक होते,
काही बाहेरचे लोक होते, अशी माहिती मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणतंही काम जबरदस्तीने होणार नसल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बंद पडलेले प्रकल्प पुढे नेत आहे

जे प्रकल्प अडीच वर्ष बंद केले होते. आम्ही आल्यानंतर आठ दहा महिन्यांत बंद पडलेले प्रकल्प पुढे नेत आहोत.
अडवलेले, प्रलंबित राहिलेल्या प्रकल्पांना चालना देतोय ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री म्हणून सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. अडीच वर्षे अहंकार आणि इगोमुळे प्रकल्प अडवले होते.
ते पुढे नेत असून विरोधी पक्षाला याचं दु:ख आहे. विरोधासाठी विरोध करु नका. जाणीवपूर्वक भांडवल केलं जात आहे.
प्रकल्पाला संमती असल्याचं पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवलं होतं. त्यामुळे राजकारणासाठी राजकारण करु नका,
असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

 

 

Web Title :-  CM Eknath Shinde | more than 70 percent people agree to barsu refinery project says cm eknath shinde

 

हे देखील वाचा :

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

Barsu Refinery Survey | बारसूमध्ये पोलीस व आंदोलकांमध्ये पुन्हा राडा, पोलिसांकडून आदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

Pune BJP Jagdish Mulik On Congress Mallikarjun Kharge | भाजपचे शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांचे काँग्रेसवर शरसंधान; म्हणाले – ‘गांधी कुटुंबाचे पोपट बोलू लागले’

 

Related Posts