IMPIMP

Barsu Refinery Project | ‘खोटे गुन्हे दाखल करुन प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केला तर…’, बारसू प्रकरणावरुन काँग्रेसचा सरकारला इशारा

by nagesh
Barsu Refinery Project | don t try to impose the barsu project on people will do tit for tat congress leader nana patole

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – बारसू रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) स्थानिकांचा मोठा विरोध असताना शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करत आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांवर पोलीस बळाचा वापर केला जात असून काँग्रेस (Congress) पक्ष स्थानिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सरकारने जनतेची डोकी फोडून, खोटे गुन्हे (FIR) दाखल करुन प्रकल्प (Barsu Refinery Project) रेटण्याचा प्रयत्न करु नये, अन्यथा आम्ही सरकारला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

 

 

सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे

राज्यातील सरकार बारसू प्रकल्पासाठी (Barsu Refinery Project) स्थानिकांवर जबरदस्ती करत आहे. आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. आजही पोलिसांनी आंदोलकांवर बळाचा वापर केला. स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय बारसू रिफायनरी प्रकल्पाचा निर्णय सरकारने घेऊ नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. सरकार जर पोलिसांच्या बळावर प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर अन्याय, अत्याचार करणार असेल तर ते खपवून घेणार नाही, असेही पटोले यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सरकार चर्चेपासून पळ काढत आहे

सरकारने काही लोकांच्या हितासाठी व दिल्लीच्या दबावाखाली निर्णय घेण्याचा प्रयत्न करु नये. आम्ही बारसू येथे जाऊन तिथल्या लोकांची मतं जाणून घेतली आहेत. तसेच समर्थक विरोधक, सर्व बाजूच्या लोकांशी सुद्धा चर्चा करुन त्यांची मतं घेतली आहेत. सरकार स्थानिकांशी, प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांशी चर्चा का करत नाही? चर्चेपासून सरकार पळ का काढत आहे? असा प्रश्नही त्यांनी शिंदे सरकारला विचारला. तसेच सरकारने सामंजस्याची भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढावा. आंदोलकांना संयमाने हाताळावं, दुर्दैवाने काही अघटित घडले तर सरकारला माहागात पडेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.

 

 

Web Title :-  Barsu Refinery Project | don t try to impose the barsu project on people will do tit for tat congress leader nana patole

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | बारसू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले-‘स्थानिकांच्या संमतीशिवाय कोणताही प्रकल्प करणार नाही’ (व्हिडिओ)

Maharashtra Prisons Department News | राज्य कारागृह विभागातील 49 अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशंसनीय सेवेबद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर ! अप्पर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची घोषणा

Barsu Refinery Survey | बारसूमध्ये पोलीस व आंदोलकांमध्ये पुन्हा राडा, पोलिसांकडून आदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

 

Related Posts