IMPIMP

BJP leader Mohit Kumboj | लाऊडस्पीकरसाठी 5 हजार जणांनी केले अर्ज; कंपनीला दिले कंत्राट ! मोहित कुंबोज म्हणाले…

by nagesh
BJP leader Mohit Kumboj | BJP leader mohit kamboj the company was given the job ofmaking loudspeakers so much demand has been received says mohit kamboj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP leader Mohit Kumboj | गुढीपाडवा मेळाव्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी
मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांमधून चालणाऱ्या अजान विरोधात मोठ्या आवाजाने हनुमान चालीसा लावण्याचे आदेश मनसे सैनिकांना दिले होते.
त्यानंतर मुंबईत मनसे कार्यकर्त्यांनी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावली. परंतु पोलिसांनी त्यावर कारवाई केली. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर काहींनी टीका केली तर काहींनी समर्थनही केले आहे. दरम्यान, भाजप नेते मोहित कुंबोज (BJP leader Mohit Kumboj) यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. इतकंच नाही तर त्यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी मोफत लाऊड स्पीकर (Loudspeaker) देण्याची घोषणाही केली होती. तशी माहिती ट्विटरवरून दिली होती. त्यासाठी आता त्यांच्याकडे 5 हजार जणांनी अर्ज केला आहे. त्यामुळे हे भोंगे बनवण्यासाठी एका कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. अशी माहिती कुंबोज यांनी दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

मोहित कुंबोज (BJP leader Mohit Kumboj) यांनी ट्विटरवरून माहिती देताना असे म्हंटले होते की, ”ज्यांना मंदिरात लाऊडस्पीकर लावायचे आहे, त्यांनी आमच्याकडून मोफत घेऊन जावे. सर्व हिंदूंचा एकच आवाज! जय श्री राम! हर हर महादेव, त्यावेळी त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) भोंग्या संदर्भात काय निर्णय दिला आहे याची माहिती दिली. त्यानंतर या मोफत लाऊड स्पीकर योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत 5 हजार जणांनी अर्ज केला असल्याचे सांगत कुंबोज म्हणाले की,
इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने हे काम एका कंपनीला दिले आहे. आम्ही फक्त मंदिरांनाच लाऊड स्पीकर देणार आहोत.
आलेल्या अर्जाची तपासणी करणार आहोत. आणि त्यानंतरच लाऊड स्पीकरच्या वितरणाला सुरुवात होईल,” असे कुंबोज यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी मनसेकडून हनुमान चालीसा लावण्यात येत आहे.
त्यामुळे राज्यातील केवळ राजकीयच नाही तर सामाजिक वातावरणही ढवळून निघाले आहे.

 

 

Web Title :- BJP leader Mohit Kumboj | BJP leader mohit kamboj the company was given the job ofmaking loudspeakers so much demand has been received says mohit kamboj

 

हे देखील वाचा :

Tina Datta Stylish Look | स्टाईलिश साडी नेसून टीना दत्तानं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहते झाले घायाळ…!

Devendra Fadnavis | ‘सगळ्यांना अडीच वाजताच मेसेज आले अन् पोलिसांना पत्ताच नव्हता, हे खूप मोठं अपयश’ – देवेंद्र फडणवीस

Sunny Leone Hot Video | समुद्राच्या मध्यभागी सनी लिओनीसोबत घडली भयंकर घटना, पाहा व्हायरल व्हिडिओ

 

Related Posts