IMPIMP

Devendra Fadnavis | ‘सगळ्यांना अडीच वाजताच मेसेज आले अन् पोलिसांना पत्ताच नव्हता, हे खूप मोठं अपयश’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | sharad pawar reaction on devendra fadnavis claims of morning oath with ajit pawar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक (Silver Oak) या घरावर एसटी कामगारांनी (ST Workers) हल्ला केल्या प्रकरणी राज्यात वातावरण तंग झालं आहे. एसटी कामगारांनी (MSRTC Workers) पवार यांच्या घरावर चप्पल, दगडफेक केल्याने पोलिसांचीही (Mumbai Police) तारांबळ उडाली. दरम्यान यानंतर सत्ताधारी आणि विराधकात आरोपांच्या फैरी झडू लागल्या असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. ‘शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. परंतु, ही घटना म्हणजे पोलीस यंत्रणेचे मोठे अपयश असल्याचं,’ देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कोल्हापूर (Kolhapur News) येथे माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ”मी कालच या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रात असा हल्ला होणे योग्य नाही. एसटी कर्मचाऱ्या संदर्भात मुद्दे योग्य व्यासपीठावर मांडले गेले पाहिजेत. सरकारनेही त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. मात्र, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा निषेधार्ह होता. मात्र, या घटनेमुळे एक वेगळाच प्रश्न उपस्थित झाला आहे.” असं ते म्हणाले.

 

पुढे फडणवीस म्हणाले, ”एसटी आंदोलक शरद पवार यांच्या घरावर जाणार, हे संपूर्ण मीडियाला माहिती होते.
सगळ्यांना अडीच वाजताच मेसेज आले होते. मात्र, पोलिसांना याची कल्पना नव्हती.
सिल्व्हर ओकवर प्रसारमाध्यमं पोहोचली, मग पोलीस कुठे होते ? एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात आणि पोलिसांना काहीही माहिती नसते.
हे दृश्य भयावह होते. हे सर्व सुरु असताना पोलीस काय करत होते ? हे पोलीस यंत्रणेचे मोठे अपयश आहे.
या हल्ल्याप्रमाणेच पोलीस यंत्रणेच्या अपयशाचीही चौकशी झाली पाहिजे.”

 

Web Title :- Devendra Fadnavis | msrtc employees strike at sharad pawar home in mumbai is big failure of devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Sunny Leone Hot Video | समुद्राच्या मध्यभागी सनी लिओनीसोबत घडली भयंकर घटना, पाहा व्हायरल व्हिडिओ

Devendra Fadnavis On Mumbai Police | शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘पोलीस काय करत होते ?’

Jalgaon Crime | थरारक ! भरधाव आयशर थेट घरात घुसला; अंघोळ करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यु

 

Related Posts