IMPIMP

BJP MLA Nitesh Rane | उद्धव ठाकरेंवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले-‘उद्धव ठाकरे हे नाXX…’

by nagesh
 BJP MLA Nitesh Rane | nitesh rane attacks uddhav thackeray over anil parab mhada home

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – म्हाडा वसाहतीतील (Mhada Colony) कार्यालय तोडण्यावरुन शिवसेना (Shivsena) नेते आमदार अनिल परब (MLA Anil Parab) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आमने-सामने आले आहेत. अनिल परबांचं कार्यालय तोडले. तसेच नारायण राणे (Narayan Rane) यांचं घर तोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या तिथे माझ्याबरोबर येणार का? मी तिथे सर्व म्हाडातील लोकांना घेऊन जाणार असल्याचा इशारा अनिल परब यांनी दिला आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांची जीभ घसरली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) म्हणाले, अनिल परबांनी तारीख आणि वेळ सांगावी, आम्ही त्यांच्यासाठी चहा तयार ठेवतो. कोरड्या धमक्या देऊ नये. न्यायालय न्यायालयाचे काम करेल. आमच्या घरात येऊन, धिंगाणा घालणं सोप्प नसून, हे ‘मातोश्री’ (Matoshree) नाही. आम्ही पण असं स्वागत करु की परत राणेंच्या घराजवळ फिरकणार नाहीत.

 

परबांचे घर झाकी ‘मातोश्री 2’ बाकी है
दुसऱ्यांची घरं पाडण्याची तयारी देणाऱ्या लोकांबरोबर कधीतरी नियती खेळ करत असतेच.
आमचं, कंगणाचं घर सोडले. कधी कोणाला अटक केली. अनिल परब हे मातोश्रीचे कारकून आहेत.
उद्धव ठाकेरेंच्यात हिम्मत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाXX आहेत.
त्यांना परबांसारखे कारकून लागतात. त्यामुळे परबांचं घर झाकी है मातोश्री 2 बाकी है,
मातोश्री 2 मध्ये कोणत्याही शिवसैनिक आणि शिल्लक सेनेच्या नेत्याला प्रवेश नाही, असा टोला नितेश राणेंनी लगावला.

 

Web Title :- BJP MLA Nitesh Rane | nitesh rane attacks uddhav thackeray over anil parab mhada home

 

हे देखील वाचा :

Budget 2023 | अर्थसंकल्पातील शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवरून राजू शेट्टींनी केंद्र सरकारला फटकारले; म्हणाले…

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी

Budget 2023 | मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Pune Crime News | दहशत माजवणाऱ्या पुण्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची दुसरी कारवाई

 

Related Posts