IMPIMP

Bodybuilding Competition | मानलं रे पठ्या ! सातासमुद्रापार महाराष्ट्रातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा डंका; जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

by nagesh
Bodybuilding Competition | bodybuilding and physique championship 2021 API subhash pujari

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Bodybuilding Competition | उझबेकिस्तानमध्ये (uzbekistan) नुकतीच १२ वी जागतिक वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक्स चॅम्पियनशिप २०२१ (bodybuilding and physique championship 2021) स्पर्धा पार पडली. त्यामध्ये लंडन देखा पॅरिस देखा और देखा जापान, सारे जगमें कही नही हैं दुसरा हिंदुस्थान, I love my INDIA या गीतावर कोल्हापूरच्या सुपुत्राने शरीरसौष्ठव दाखवले अन उपस्थित भारतीयांची मने अभिमानाने भरून आली. आणि सर्व जण म्हणू लागले मानलं रे पठ्या… सातासमुद्रापार डंका करणाऱ्या कोल्हापूरच्या (Kolhapur News) सुपुत्राचं नाव आहे सुभाष पुजारी (API subhash pujari). त्यांनी कांस्य पदकाची कमाई करून देशाबरोबरच महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला. (Bodybuilding Competition)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावचे असणारे पुजारी हे सध्या महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API subhash pujari) म्हणून ते कार्यरत आहेत. पोलीस दलात त्यांची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली होती पण ते तेवढ्यावर ते थांबले नाही त्यांनी अथक परिश्रम घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत मजल मारली. नोकरी सांभाळत असताना त्यानी व्यायामात कधीही खंड पडू दिला नाही. बारा तास सेवा बजावून रोज चार ते पाच तास व्यायाम करायचे आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले आहे.

 

मास्टर भारत श्री या स्पर्धेत खुल्या गटात सुवर्णपदक

पंजाब लुधियाना येथे झालेल्या मास्टर भारत श्री या स्पर्धेत खुल्या गटात सुवर्णपदक पटकावून पुजारी यांना भारत श्री चा मान मिळाला. त्यानंतर त्यांना वेध लागले ते जागतिक स्पर्धेत भारताचा ठसा उमठवण्याचे. तशी त्यांनी सुरुवात केली. महाराष्ट्र् पोलीस दलातून देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. १२ व्या जागतिक वर्ल्ड बॉडीबिल्डिंग अँण्ड फिजिक्स चॅम्पियनशिप २०२१ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. (Bodybuilding Competition)

 

Web Title : Bodybuilding Competition | bodybuilding and physique championship 2021 API subhash pujari

 

हे देखील वाचा :

Supreme Court | अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती ही सवलत आहे, अधिकार नव्हे – सर्वोच्च न्यायालय

Bank FD Rules | तुम्ही सुद्धा केली असेल बँकेत FD तर जाणून घ्या महत्वाच्या ‘या’ गोष्टी, अन्यथा होईल मोठे नुकसान

Aadhaar Card मध्ये नाव अपडेट करणे आता झाले आणखी सोपे, ‘या’ पोर्टलवरून तात्काळ करू शकता रिक्वेस्ट; जाणून घ्या पद्धत

 

Related Posts