IMPIMP

Bol Hari Bol Marathi Movie | 28 एप्रिलला नक्की बघा… ‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘बोल हरी बोल’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची भन्नाट केमिस्ट्री!

by nagesh
Bol Hari Bol Marathi Movie | Be sure to watch on 28th April... World Digital Premiere of 'Bol Hari Bol' on 'Ultra Zakas OTT'!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Bol Hari Bol Marathi Movie | प्रेम, क्षमा आणि दुसऱ्या संधीची हृदयस्पर्शी कथा म्हणजे चित्रपट ‘बोल हरी बोल’. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) चौथ्या पर्वाचा विजेता अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar), चतुरस्त्र अभिनेते रमेश वाणी (Ramesh Wani), ‘नागपूर सुंदरी’ हा किताब मिळविणारी अभिनेत्री आकांक्षा साखरकर (Aakanksha Sakharkar) यांच्याबरोबरच प्रतिक सुरेश (Pratik Suresh), मीरा पाथरकर (Meera Patharkar) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणारा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलपासून एक्स्क्लुझिवली ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफोर्मवर (Ultra Jhakaas OTT Platform) पहायला मिळणार आहे. निर्माता सुशीलकुमार अग्रवाल (Sushilkumar Agrawal) यांच्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केलं आहे. तर, काशी-रिचर्ड यांनी या चित्रपटाच संगीत केलं आहे. (Bol Hari Bol Marathi Movie)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी प्लॅटफोर्म सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ , ‘बोल हरी बोल’च्या रुपात एक नवा कोरा मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. (Bol Hari Bol Marathi Movie)

 

“कलाकारांची उत्तम फळी लाभलेला ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाचे अनोखे कथानक आणि उत्तम संदेश सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी पाहण्यासारखे आहे. सोबतच, ‘अल्ट्रा झकास’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट व अल्ट्रा झकासचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

 

वेगळा अनुभव

‘बोल हरी बोल’ चित्रपटातील माझी भूमिका मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. दिलखुलास आणि मनमौजी स्वभावाच्या हरी पोंक्षेची भूमिका साकारताना मला प्रचंड मजा आली. येत्या २८ एप्रिलपासून अल्ट्रा झकास या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला आमचा हा चित्रपट पाहता येणार आहे. माझ्या आजवरच्या सगळ्या भूमिकांवर भरभरून प्रेम केलेले तुम्ही सगळे हरी पोंक्षेवरही तेवढंच प्रेम कराल अशी खात्री आहे.

-अक्षय केळकर (अभिनेता, बोल हरी बोल)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उत्सुकता शिगेला…

प्रिया मालेगावकर हे चित्रपटातील पात्र मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. हे पात्र साकारण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. चित्रिकरणादरम्यान अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आता या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.

 

-आकांक्षा साखरकर (अभिनेत्री, बोल हरी बोल)

 

 

उत्तम मांडणी असलेला चित्रपट

घरोघरी घडणारी आणि आपल्या आसपास हमखास पहायला मिळणाऱ्या गोष्टींची उत्तम बांधणी म्हणजे ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट. नेहमी जगाच्या दृष्टीआड असणाऱ्या बाप-मुलाच्या नात्याची गोष्ट चित्रपटात उत्तमपणे मांडण्यात आली आहे. शेरास-सव्वाशेर असं बाप-मुलाचं नातं साकारताना मला समाधान मिळालं. २८ एप्रिलपासून, आपली आवड जपणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आमचा ‘बोल हरी बोल’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

 

-रमेश वाणी (अभिनेता, बोल हरी बोल)

‘बोल हरी बोल’ सारखा आशयघन आणि कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला भेटीला घेऊन येताना अत्यंत आनंद होत आहे. कलाकारांची उत्तम फळी आणि चित्रपटाला लाभलेलं सुमधूर संगीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल असा विश्वास वाटतो.

 

 

-अमोल बिडकर (दिग्दर्शक, बोल हरी बोल)

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे. ‘अल्ट्रा झकास’ हा ओटीटी प्लॅटफोर्म अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले-स्टोअर आणि अॅपल वापरकर्त्यांसाठी ॲप-स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्या आवडीनुसार सबस्क्रिप्शन घेऊन तुम्हाला ‘अल्ट्रा झकास’वरच्या झकास कन्टेंटचा आनंद घेता येणार आहे. १४९ रुपयांत तीन महिन्यांसाठी आणि २९९ रुपयाच्या सवलतीच्या दरात वार्षिक सबस्क्रिप्शन असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Bol Hari Bol Marathi Movie | Be sure to watch on 28th April… World Digital Premiere of ‘Bol Hari Bol’ on ‘Ultra Zakas OTT’!

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली’ शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय? अजित पवारांनी सांगितलं…

Pune PMC 24×7 Water Scheme | सूस, म्हाळुंगे या गावात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार

Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar | महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आणि कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : सहायक आयुक्त संगीता डावखर

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘जसे त्यांनी त्यांच्या काकांकडे…’

 

Related Posts