IMPIMP

Bullock Cart Race | बैलगाडा शर्यतीच्या परवानगी बाबत मोठा निर्णय, आता स्थानिक पातळीवरच मिळणार परवानगी

by nagesh
Maharashtra New Rules For Bullock Cart Race | maharashtra thackeray government announces new rules for bullock cart race

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनबैलगाडा शर्यतींना (Bullock Cart Race) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परवानगी (Permission) दिल्यानंतर बैलगाडा मालक आणि आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात जत्रा – यात्रांचा हंगाम सुरु झाल्याने जिल्हा प्रशासनाकडून (District Administration) बैलगाडा शर्यतीला (Bullock Cart Race) परवानगी मिळावी, यासाठी अर्जाची संख्या वाढली आहे. यामुळे लोकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने आता बैलगाडा शर्यतीची परवानगी देण्याच्या अधिकाराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता बैलगाडा शर्यतीची परवानगी देण्याचे अधिकार तालुकास्तरावर प्रांताधिकारी (Prantadhikari) यांना दिले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुणे जिल्ह्यातील (Pune District) बहुतांश गावात बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race) आयोजन केले जात आहे. त्यातच ग्रामीण भागात सध्या जत्रा-यात्रा सुरु झाल्याने परवानगीच्या अर्जाचे प्रमाण वाढले आहे. लहान-मोठ्या गावात भरवल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतींसाठी लोकांना थेट पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune Collectorate) अर्ज करावा लागत होता. यासाठी अनेक हेलपाटे मारावे लागत आहे. लोकांचे हेलपाटे वाचवण्यासाठी व लोकांच्या सोयीसाठी आता परवानगी देण्याचे अधिकार प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहेत.

 

जाचक अटी कमी केल्या
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली असली तरी, यासाठी अनेक जाचक अटी (Oppressive Conditions) घातल्या जात आहेत. तसेच परवानगीसाठी तहसीलदार (Tehsildar), पोलीस (Police) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी 8 – 10 दिवस लागतात. तसेच परवानगीसाठी थेट पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लहान – मोठ्या गावांना अवघड होऊन बसले. सध्या जिल्ह्यामध्ये जत्रा आणि यात्रांचा हंगाम सुरु असून, पारंपारिक, नवसाचे बैलगाडा पळवले जातात. यासाठी शासनाकडून जाचक अटी कमी करुन बैलगाडा शर्यतींना परवानगी देण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात यावेत अशी नागरिकांची मागणी होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Bullock Cart Race | permission bullock cart racing local level provincial authorities right to allow pune news

 

हे देखील वाचा :

10th-12th Exams Offline | सीबीएसई व अन्य शिक्षण मंडळाच्या 10 वी व 12 वी च्या परीक्षा ऑफलाईन; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Nashik Crime | भोंदूबाबाचा महिलेसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार, वकिलासह दोघेजण गजाआड

Education News | एका गुणासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांने लढली 3 वर्षे न्यायालयीन लढाई, अखेर मिळाले 28 गुण वाढवून

 

Related Posts