IMPIMP

Education News | एका गुणासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांने लढली 3 वर्षे न्यायालयीन लढाई, अखेर मिळाले 28 गुण वाढवून

by nagesh
HC On Minor Girl Rape Case | 'Intercourse with the consent of a minor girl is rape' - Delhi High Court

भोपाळ : वृत्तसंस्थाEducation News | एखाद्या विषयामध्ये जर कमी गुण मिळाले तर विद्यार्थी हताश होत असतात. हे आपण पाहिलेच आहे. काही
जण तर फेरतपासणीसाठी जातात. पण मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातून अशी एक घटना समोर आली आहे की, एका १२ वीच्या विद्यार्थ्याने
गुणपत्रिकेत एक गुण वाढवून मिळवण्यासाठी माध्यमिक शिक्षण मंडळाविरोधात तब्बल तीन वर्षे न्यायालयीन लढाई लढली. नुसती लढाई लढली नाही
तर ती जिंकलीही. ज्यावेळी त्याच्या उत्तर पत्रिकेची पुनर्तपासाणी झाली तेव्हा त्याला एका गुणाऐवजी तब्बल २८ गुण वाढवून मिळाले. शांतनू शुक्ल असे
या विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, या खटल्यासाठी त्याला ४० वेळा न्यायालयात हजर रहावे लागले असून तीन वर्षात खटला लढण्यासाठी त्याला १५
हजार रुपये खर्च करावे लागले आहे. (Education News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शांतनू शुक्ल हा परकोटा येथील असून त्याने २०१८ मध्ये मध्य प्रदेश बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ७४.८ टक्के गुण मिळवले होते. मात्र, अभ्यास चांगला
झाल्याने त्याला ७५ ते ८० टक्के गुण मिळतील असा विश्वास होता. पण एक गुण कमी मिळाल्याने ७५ टक्के गुण मिळवता आले नाही. इतकच नाही तर
त्याला मुख्यमंत्री मेधावी योजनेचा ही लाभ घेता आला नाही. मात्र, आता तीन वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर शांतनूला २८ गुण मिळणार असून त्याची
टक्केवारी ८१ टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय त्याला मेधावी योजनेचा ही लाभ घेता येणार आहे. (Education News)

 

यासंदर्भात बोलताना शांतनू म्हणाला की, कोरोना संसर्गामुळे या खटल्याची सुनावणी दोन वर्षे झाली नाही. ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने
बोर्डाला सहा नोटीस पाठवल्या. परंतु, बोर्डाने काहीही भूमिका मांडली नाही. फेरतपासणीची मागणी केली. ती मान्य झाली. पण एकही गुण वाढला नाही.
त्यानंतर विविध विषयांच्या पेपरची कॉपी काढली. त्यात प्रश्नांची उत्तरे योग्य असल्याची टीक होती. पण त्याचे गुण दिले नव्हते. २०१८ मध्ये याचिका दाखल
केली होती. त्यावर सुनावणी झाली. माध्यमिक शिक्षण मंडळाला न्यायालयाने पुन्हा मूल्यांकन करण्याचे आदेश दिले. २१ फेब्रुवारीला नवीन गुणपत्रिका
मिळाली. त्यात ८०.४ टक्के गुण मिळाल्याचा उल्लेख आहे.

 

 

 

Web Title :- Education News | fighting for 1 point increase in marksheet three years of court battle

 

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | कोट्यवधीं खर्चून हॉस्पीटल उभारणीचे स्वप्न दाखविणारी महापालिका 3-4 कोटी खर्चून स्वत:ची RTPCR लॅब उभारू शकली नाही; ‘कोरोना’च्या लाटेत स्वॅब टेस्टिंगवर केला कोट्यवधींचा खर्च

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बनावट प्रमाणपत्रांव्दारे केलं पास; 650 बोगस प्रमाणपत्रे जप्त

Corporator Tushar Kamathe | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला तिसरा झटका ! नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा

 

Related Posts