IMPIMP

Nashik Crime | भोंदूबाबाचा महिलेसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार, वकिलासह दोघेजण गजाआड

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

नाशिक / येवला : सरकारसत्ता ऑनलाइनNashik Crime | मुलीवर जादूटोणा (Witchcraft) केल्याचे सांगत महिलेवर आणि तिच्या 3 मुलींवर
दोन वर्षापेक्षा अधिक काळ भोंदूबाबा (Bhondubaba) व त्याच्या भावाने बलात्कार (Rape) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही
घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik Crime) येवला शहरात (Yeola City) घडली आहे. याबाबत पोलिसांनी दोन जणांवर बलात्कार तसेच धमकी
(Threat) देऊन पैसे उकळल्याचा गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच लग्न जमत नसल्याने येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे गेली होती. यावेळी भोंदूबाबाने मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून फिर्यादी मुलीवर बलात्कार केला. तसेच त्याचा व्हिडिओ (Video) काढून व्हिडिओची धमकी देऊन आणखी दोन मुलींवर बलात्कार केला. भोंदूबाबा आणि त्याच्या वकील (Lawyer) सहकाऱ्याने तब्बल 2 वर्षे 4 महिने वेळोवेळी आई व तिच्या तिन्ही मुलींवर बलात्कार करुन ब्लॅकमेल (Blackmail) केले. आरोपींनी पीडित महिलेकडून आठ लाख रुपये उकळल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. (Nashik Crime)

 

दरम्यान, एका मुलीला हिंदू धर्माबद्दल (Hindu Religion) द्वेष निर्माण करुन मुस्लिम (Muslim) बनवण्यास प्रवृत्त केले म्हणूनही येवला शहर पोलीस ठाण्यात (Yeola City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भोंदूबाबा व त्याचा सहकारी वकील या दोघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Nashik Crime | bhondubaba raped 3 girls and mother police arrested two including lawyer in nashik police

 

हे देखील वाचा :

Education News | एका गुणासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांने लढली 3 वर्षे न्यायालयीन लढाई, अखेर मिळाले 28 गुण वाढवून

Pune Municipal Corporation (PMC) | कोट्यवधीं खर्चून हॉस्पीटल उभारणीचे स्वप्न दाखविणारी महापालिका 3-4 कोटी खर्चून स्वत:ची RTPCR लॅब उभारू शकली नाही; ‘कोरोना’च्या लाटेत स्वॅब टेस्टिंगवर केला कोट्यवधींचा खर्च

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई ! बनावट प्रमाणपत्रांव्दारे केलं पास; 650 बोगस प्रमाणपत्रे जप्त

 

Related Posts