IMPIMP

Central Consumer Protection Authority (CCPA) | दिशाभूल करणार्‍या जाहिरांतींना लागणार लगाम ! सरकारने Naapatol आणि Sensodyne विरुद्ध जारी केला आदेश

by nagesh
Central Consumer Protection Authority (CCPA) | government has issued orders against naaptol and sensodyne

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकेंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकारणाने Central Consumer Protection Authority (CCPA) दिशाभूल करणार्‍या जाहिरातींविरूद्ध कठोर पाऊल उचलले आहे. Central Consumer Protection Authority (CCPA) ने दिशाभूल करणार्‍या जाहिराती दाखवण्यात दोषी आढळलेल्या ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंझ्युमर हेल्थकेयर लि. (GlaxoSmithKline (GSK) Consumer Healthcare Ltd) ला भारतात सेन्सोडाईन (Sensodyne) उत्पादनाची जाहिरात बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सीसीपीएने एका पत्रकात म्हटले होते की, नियमांच्या उल्लंघनाबाबत जाहिरातीवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. सीसीपीएने प्रकरणाची स्वत: दखल घेतली आणि 27 जानेवारीला ग्लॅक्सोस्मिथक्लाईन कंझ्युमर हेल्थकेयरविरूद्ध आदेश पारित केला.

 

प्राधिकरणाने नापतोल ऑनलाईन शॉपिंग लिमिटेडविरूद्ध (Naaptol Online Shopping Private Limited) सुद्धा उत्पादनांच्या प्रचार-प्रसारात दिशाभूल करणार्‍या जाहिराती आणि अयोग्य व्यापार कृतींच्या वापराविरूद्ध आदेश जारी केला आहे. तर सीसीपीएने 2 फेब्रुवारीला नापतोलला जाहिरात बंद करण्याचा आदेश दिला.

 

सीसीपीएने ग्लॅक्सोस्मिथक्लाईनला देशभरात सेन्सोडाईनच्या जाहिरातींवर या आदेशाच्या एका आठवड्यात प्रतिबंध लावण्यास सांगितले आहे. आदेशात म्हटले आहे की, या जाहिरातीत दाखवण्यात आले आहे की, देशाच्या बाहेरील डेन्टीस ही टूथपेस्ट वापरण्याचा सल्ला देत आहेत. आदेशात म्हटले आहे की, कंपनी भारतात लागू कायद्याच्या बाहेर जाऊन परदेशी डेन्टीसला याबाबत सल्ला देताना दाखवू शकत नाही.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नापतोलवर (Naaptol) लावला 10 लाखांचा दंड
याशिवाय सीसीपीएने नापतोल ऑनलाईन शॉपिंगला सेट ऑफ 2 गोल्ड ज्वेलरी, मॅग्नेटिक सपोर्ट आणि एक्युप्रेशर योग स्लिपर्सच्या जाहिरातींवर बंद घालण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय नापतोलवर 10 लाखांचा दंड सुद्धा लावण्यात आला आहे.

 

Web Title :- Central Consumer Protection Authority (CCPA) | government has issued orders against naaptol and sensodyne

 

हे देखील वाचा :

Hinganghat Burning Case | हिंगणघाट जळीत प्रकरणात दोषी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

Airtel पुन्हा देणार महागाईचा झटका! यावर्षी पुन्हा महाग होऊ शकतात Prepaid Plans

Ajit Pawar | ‘तुम्ही आयुष्यभर जमिनी लाटल्या’, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरुन अजित पवारांचा पलटवार; म्हणाले…

 

Related Posts