IMPIMP

Central Railway Megablock | ठाणे ते दिवा दरम्यान 36 तासांचा मेगाब्लॉक; ठाणे ते कल्याण दरम्यान एकही ‘लोकल’ ट्रेन धावणार नाही, पण…

by nagesh
Indian Railways | irctc here s how you can book 12 tickets from one user id in a month

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Central Railway Megablock | ठाणे आणि दिवा (Thane to Diva) दरम्यान 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेचं काम मध्य रेल्वे (Central Railway) आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीने (Mumbai Railway Development Corporation) करण्यात येत आहे. या कारणामुळे ठाणे ते दिवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी 36 तासांचा ब्लॉक (Central Railway Megablock) घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 8 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान सुरु राहणार आहे. आज (शनिवारी) दुपारी 2 वाजल्यापासून ब्लॉक सुरु होईल. तो ब्लॉक सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु राहील, याबाबत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

8, 9 आणि 10 जानेवारी रोजी 36 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा (Thane to Diva) दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिका साठी मध्य रेल्वेकडून युद्ध पातळीवर काम सुरू असल्याने मध्य रेल्वेनं जाहीर केलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमध्ये ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही. या मार्गिकेवरील जलद लोकल सेवा मात्र सुरु असणार आहे. (Central Railway Megablock )

 

या मेगाब्लॉकदरम्यान मुंबई ते कर्जत, कसारा, अंबरनाथ, बदलापूरच्या दिशेने धावणाऱ्या सर्व अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाड्या या ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरून न धावता जलद मार्गावर धावणार आहेत. त्याचबरोबर काही मेल एक्स्प्रेस गाड्या आणि लोकल गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. 10 जानेवारी रोजी सकाळपासून अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल गाड्या या नेहमीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत. रद्द झालेल्या गाड्यांची संपूर्ण माहिती https://cr.indianrailways.gov.in/ या अधिकृत रेल्वेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title: Central Railway Megablock | 36 hour megablock between Thane and Diva; No local train will run between Thane and Kalyan, but …

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | आशिष शेलारांना धमकी मिळाल्यानंतर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या – ‘मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये’

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्याचे 5 सुपर स्टॉक ! एकाने दिला 90% रिटर्न तर उर्वरित 70 टक्केपक्षा जास्त वाढले

Pune Corona | चिंताजनक ! शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 11 हजारांहून अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2471 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts