IMPIMP

Chandrakant Patil | ‘संजय राऊत हे शरद पवारांचे एजंट त्यांनी प्लॅन करून….’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांवर गंभीर आरोप

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil on shivsena leader and mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chandrakant Patil | देशामधील अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि सरकारमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. मात्र भाजपने (BJP) हा संघर्ष महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामध्ये ज्या पातळीला नेवून ठेवलाय त्याची काळ्या अक्षरात नोंद होईल. महाराष्ट्रातील राज्यपालांनी कायदा भंग (Law) करण्याची भूमिका त्यांनी हातात घेतली असल्याची टीका शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP State President) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांवर गंभीर आरोप केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा जामीन (Bail) फेटाळुनही राज्य सरकार राजीनामा (Resignation) घेत नाही. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्याही रिसॉर्टवर केंद्रीय पर्यावरण खात्याने (Central Environment Department) कारवाई केली तरी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. या सगळ्याचीही महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी (Chandrakant Patil) राऊतांना दिलं आहे.

 

संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे एजंट आहेत.
राऊत यांनी योजनापुर्वक शिवसेना – भाजपमध्ये अंतर केलं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.
2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर शिवसेना युतीतून (Alliance ) बाहेर पडली होती. त्यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) साथीने सरकार स्थापन केलं होतं.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, मुख्य न्यायमूर्ती (Chief Justice) आणि मुख्यमंत्र्यांनाही (CM) राज्यपालच शपथ देतात.
त्यामुळे राज्यपालांचं पद सर्वोच्च आहे. या पदाचा स्वायतत्ता कायम राहिला पाहिजे, असंही पाटील म्हणाले.
पाटलांनी केलेल्या टीकेवर राऊत काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil on shivsena leader and mp sanjay raut

 

हे देखील वाचा :

Pune Crime | जमिनीच्या वादातून चुलत भावाने बहीणवर तब्बल 35 वार करुन केला खून

Nashik Police | पोलीस चौकीतच रंगली होती ओली पार्टी ! नागरिकाला झिंगलेल्या पोलिसांनी केली मारहाण; प्रचंड खळबळ

Gold Price Today | आज पुन्हा सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

 

Related Posts