IMPIMP

Vedanta-Foxconn Project | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाचे भूमिपूजन कधी झाले, फोटो दाखवा, आशिष शेलारांचे शिवसेनेला चॅलेंज

by nagesh
Ashish Shelar | Those who did not wipe the tears of farmers in two and a half years, are now touring, Ashish Shelar's attack on Uddhav Thackeray

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Vedanta-Foxconn Project | वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन (Vedanta-Foxconn Project) शिवसेनेला (Shivsena) आव्हान दिले आहे. वेदांता प्रकल्प राज्यात आला कधी होता? या प्रकल्पाला सवलत दिल्याची आधीच्या सरकारने कागदपत्र दाखवावीत. या प्रकल्पासाठी जागा घेतल्याचा पुरवा दाखवा, भूमिपूजन झाल्याचे फोटो दाखवा असे आव्हान शेलार यांनी शिवसेनेला दिले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) महाराष्ट्रात येणार हे निश्चित होते तर ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) काळात तळेगावची (Talegaon) जमीन संपादित का केली नाही, प्रकल्पाचे भूमिपूजन का झाले नाही, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. यावेळी शेलार यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे हा प्रकल्प महाराष्ट्रात होता आणि नंतर तो गुजरातमध्ये नेण्यात आला, आशाप्रकारे बोलत होते.

 

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात कोणताही करार झाला नव्हता. मग जो प्रकल्प महाराष्ट्रात आलाच नाही तो गेला कसा, असा सवाल आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या या दाव्याचे पितळ उघडे पाडण्यासाठी ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात किती प्रकल्प आले, किती करार झाले, त्याची पायाभरणी झाली आणि किती प्रकल्पांच्या व्यवहारांमध्ये कट-कमिशन मागण्यात आले,
या सगळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची (Retired Judges) चौकशी समिती (Inquiry Committee)
नेमावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केल्याचे शेलार यांनी सांगितले.

 

यावेळी शेलार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचाही समाचार घेतला.
ते म्हणाले, गेल्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री (Finance Minister) होते.
त्यावेळी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी किती करसवलत दिली?
ज्या पद्धतीने करसवलत फॉक्सकॉनला अपेक्षित होती, त्या करसवलतींची गती अजित पवार यांच्या काळात मंतिमंदासारखी का होती? अजित पवारांनी दारूविक्रेत्यांना सवलती दिल्या तशाच सवलती या कंपन्यांना का दिल्या
नाहीत, असा हल्लाबोल शेलार यांनी अजित पवारांवर केला.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vedanta-Foxconn Project | bjp leader ashish shelar slams aaditya thackeray shivsena ajit pawar over vedanta foxconn project

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | महिलेचे फोटो मॉर्फ करुन विनयभंग, 2 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनवर पिंपरी पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | वारजे माळवाडी परिसरात दहशत पसरवणारा अट्टल गुन्हेगार स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 77 जणांवर कारवाई

Poor Eyesight | चष्मा लावण्याची येणार नाही वेळ, अवलंबा ‘हे’ 5 रामबाण उपाय; अनेक समस्यांपासून मिळेल आराम

 

Related Posts